धारावी मध्ये सुशील शिक्षण संस्था -सार्वजनिक मित्र मंडळ यांच्यातर्फे आयोजित सार्वजनिक श्री गणेश सजावट स्पर्धेचा भव्य पारितोषिक वितरण सोहळा

0
653

प्रतिनिधी मुंबई: सुशील शिक्षण संस्था सार्वजनिक मित्र मंडळ मुंबई यांच्यातर्फे सार्वजनिक श्री गणेश सजावट स्पर्धा 2023 आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेच्या परीक्षक समितीमध्ये साक्षी परांजपे- सिने अभिनेत्री, वर्षा पडवळ- सिने अभिनेत्री, सिद्धी कामत – सिने अभिनेत्री, तुषार खेडेकर – सिने अभिनेता, वैशाली खवणेकर – सिने अभिनेत्री, उमेश ठाकूर – सिने अभिनेता, पूनम पवार – सिने अभिनेत्री, बाळासाहेब गोरे – चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, किरण कुडाळकर – अभिनेता निर्माता हे होते. सदर स्पर्धा धारावी विभागात मर्यादित होती. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ दिनांक 14.09.2024 रोजी श्री गणेश मंडप, न्यू पारशी चाळ, काळाकिल्ला, धारावी येथे संपन्न झाला.

पारितोषिक वितरण संस्थेचे अध्यक्ष – ॲड. मनीष माधव व्हटकर, सरचिटणीस आप्पा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर उमेश ठाकूर – सिने अभिनेता, किरण कुडाळकर – निर्माता अभिनेता, बाळासाहेब गोरे – निर्माता दिग्दर्शक, अशोक झगडे – सिने निर्माता दिग्दर्शक, तजेला बगाडे – समाजसेविका कादंबरी शिरोडकर हे उपस्थित होते तसेच संस्थेचे दिनेश माधव व्हटकर, राजा जॉर्ज, अमित माने, विनोद कांबळे, हर्षद खाडे, दिनेश डोईफोडे, योगिता पाखरे, वसंत पाखरे, गुरुनाथ बोबडे, अंकुश त्रिंबके, जितेंद्र बोबडे, मंगेश खाडे उपस्थित होते स्पर्धेत सहभागी झालेल्या मंडळांना रोख रक्कम समानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेत उत्तेजनार्थ १ हराळे सेवा संघ सकिनाबाई चाळ, बगीचा, धारावी यांना रुपये 2500/-, समानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. उत्तेजनार्थ २ न्यू भारत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, (धारावीचा सुखकर्ता) शास्त्रीनगर, धारावी. यांना 2500/-रुपये समानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

तृतीय क्रमांक श्री हनुमान सेवा मंडळ, काळा किल्ला, धारावी यांना रुपये 5000/- समानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. द्वितीय क्रमांक बाळ गोपाळ मित्र मंडळ, काळा किल्ला, बस स्टॉप जवळ, धारावी यांना रुपये 1100/- समानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

प्रथम क्रमांक इलेव्हन इंग्लिश क्रिकेट क्लब (भुताचा गणपती), शंकर कवडे चाळ, संत कक्कया मार्ग, धारावी यांना रुपये 21000/- समानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here