कोल्हापूरात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत आराम कॉर्नर येथे हातगाडी लावण्याच्या वादातून झालेल्या हाणामारीत एकाचा चाकूने भोसकून खून

0
24

कोल्हापूर : विसर्जन मिरवणुकीच्या आनंदात असलेल्या कोल्हापूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. आराम कॉर्नर येथे हातगाडी लावण्याच्या वादातून झालेल्या हाणामारीत एका व्यक्तीचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. मृत व्यक्तीचे नाव इम्रान मुझावर असल्याचे समोर आले आहे.या घटनेमुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सीपीआर रुग्णालयात इम्रानच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे, त्यामुळे रुग्णालयाच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. राजवाडा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयित आरोपी युसुफ अलमसजीत (दाजी) याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून, प्राथमिक माहितीनुसार हा वाद हातगाडी लावण्यावरून उद्भवला असल्याचे समजते.गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान या घटनेमुळे शहरात खळबळ माजली आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला असून, कोणत्याही अप्रिय घटनेला आळा घालण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे.नातेवाईक आणि नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here