कोल्हापूर :- रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यावतीने घेण्यात आलेल्या भारतीय संघ निवड चाचणी मध्ये ॲम्यच्युअर कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग असोसिएशनच्या शिक्षण महर्षी डॉ.बापूजी साळुंखे स्केटिंग प्रशिक्षण केंद्राची स्केटिंग खेळाडू आणि फोर्ट इंटरनॅशनल अकॅडमी नागाळा पार्क या स्कूलच्या क्रीडा शिक्षीका. कु. तेजस्विनी रामचंद्र कदम. हिची इटली येथे १५ ते २३ सप्टेंबर२०२४ या कालावधीमध्ये वर्ल्ड फेडरेशन यांच्यावतीने होत असलेल्या “वर्ल्ड स्केट चॅम्पियनशिप”२०२४” स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या रोलर डरबी या संघामध्ये निवड झाली आहे. तेजस्विनी ही गेली सात वर्ष राष्ट्रीय फेडरेशन अजिंक्यपद स्केटिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक विजेती खेळाडू आहे. या निवडीचा संदेश राज्य संघटनेचे अध्यक्ष पी .के .सिंग. डी एस बुलंगे व सचिव राजेंद्र जोशी यांनी पाठविला.तिला स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमारजी साळुंखे सचिवा.सौ.शुभांगी गावडे, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अनिल कदम ॲड.धनंजय पठाडे. प्रा.आकाराम पाटील. प्रा.संभाजी पाटील. जगदीश दळवी. प्रा.अजित मोहिते. संजय फराकटे.यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक डॉ.महेश अभिमन्यू कदम. राष्ट्रीय स्केटिंग कोच.भास्कर कदम.यांचे प्रशिक्षण लाभत आहे. माननीय,संपादक सो.वरील वृत्त आपल्या लोकप्रिय दैनिकामध्ये प्रसिद्ध करून सहकार्य करावे ही नम्र विनंती.डॉ. महेश अभिमन्यू कदम.