राज्यातील १००० व कोल्हापूर जिल्ह्यातील ३९ महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते २० सप्टेंबर २०२४ रोजी ऑनलाईन उद्घाटन

0
24

कोल्हापूर, दि. १८ : कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक लाभ राज्यातील युवक युवतींना व्हावा, या दृष्टीकोनातून राज्यामधील नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करुन महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजनेच्या धर्तीवर राज्यातील १००० निवडक महाविद्यालयांमध्ये “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” ची स्थापना करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ३९ महाविद्यालयांमध्ये सुरु करण्यात येणाऱ्या या केंद्रांचे मा.प्रधानमंत्री यांच्या शुभहस्ते २० सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी १२.३० वा. ऑनलाईन उद्घाटन होणार आहे. या केंद्रांमधून मोफत कौशल्य विकास कोर्सेसचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.जिल्ह्यातील श्री आनंदराव आबिटकर कॉलेज ऑफ इंजिनीरिंग पाल गारगोटी, कर्मवीर हिरे कॉलेज गारगोटी, संत गजानन महाराज ग्रामीण तंत्रनिकेतन महागाव, श्री आनंदराव आबिटकर कृषी महविद्यालय पाल गारगोटी, सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगूड, एस के.पाटील बी एड कॉलेज प्र.चिखली, कोल्हापूर, कृषी तंत्र निकेतन कागल, डी.आर.माने महाविद्यालय , कागल, न्यू पॉलिटेक्निक उंचगाव कोल्हापूर, अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट वाठार, खराडे बी. एड. कॉलेज, कोल्हापूर, डी.के.टी.ई. टेक्सटाईल अँड इंजिनीरिंग इन्स्टिटयूट इचलकरंजी, एम.एच.शिंदे महाविद्यालय तिसंगी गगनबावडा, तात्यासाहेब कोरे इन्स्टिटयूट ऑफ इंजिनीरिंग अँड टेकनॉलॉजी वारणानगर, श्री विजयसिंह यादव कॉलेज वडगाव, डॉ.बापुजी साळुंखे इन्स्टिटयूट ऑफ इंजिनीरिंग अँड टेकनॉलॉजी, कोल्हापूर, शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय, तिटवे, राधानगरी,संजीवन इंजिनीरिंग अँड टेकनॉलॉजी इन्स्टिटयूट पन्हाळा,सहकारभूषण एस.के. पाटील कॉलेज कुरुंदवाड, व्यंकटराव आर्ट्स, कॉमर्स व सायन्स महाविद्यालय, आजरा, डॉ. डी.वाय. पाटील प्रतिष्ठान कॉलेज ऑफ इंजिनीरिंग साळोखेनगर, डी.वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस तळसंदे, डी.वाय. पाटील अग्रीकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी तळसंदे, डॉ. डी.वाय. पाटील इन्स्टिटयूट गगनबावडा, डॉ. डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड टेकनॉलॉजी कसबा बावडा, राजर्षी शाहू आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज रुकडी, आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज कोवाड, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी, आर.बी.माडखोलकर महाविद्यालय चंदगड, श्री.व्यंकटेश महाविद्यालय इचलकरंजी, डी.वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटीलिटी कोल्हापूर, डॉ. डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा, दत्त द्वारका महाविद्यालय वाकरे, श्री आनंदराव आबिटकर आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज कडगाव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय पेठ वडगाव, श्रीपतराव चौगुले आर्ट्स अँड सायन्स कॉलेज कोतोली, तांबवे एज्युकेशन सोसायटी व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर पेठ वडगाव, सांगरूळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेज सांगरूळ, राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज सदर बझार कोल्हापूर इत्यादि 39 महाविद्यालयामध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येत आहे. आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांमध्ये जास्तीत जास्त उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यावा तसेच २० सप्टेंबर २०२४ रोजी मा. प्रधानमंत्री यांच्या उपस्थित होणाऱ्या कार्यक्रमास कोल्हापूर जिल्हयातील जास्तीत जास्त विद्यार्थी यांनी तसेच त्या त्या तालुक्यातील नागरिकांनी मोठया संख्येने नजिकच्या प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन स्थळी उपस्थित राहावे, असे आवाहन मा. जिल्हाधिकारी यांचेमार्फत तसेच कौशल्य विकास मार्गदर्शन केंद्रामार्फत करण्यात आले आहे. कार्यक्रम स्थळाच्या अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कोल्हापूर यांचेशी ०२३१ २५४५६७७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here