प्रतिनिधी मेघा पाटील
कोल्हापूर मध्ये सिस्टर स्काॅड या ग्रुपच्या माध्यमातून महिलांसाठी नवनवीन एंटरटेनमेंट उपक्रम राबविण्याची सलग दुसरे वर्ष!!! प्रती वर्षी प्रमाणे यावर्षी ही गौरी गणपती निमित्त महिलांसाठी झिम्मा फुगडी, काटवटकाना, लाट्या बाई लाट्या,सुप नाचविणे,घागर घुमविणे,उखाणे यासारख्या पारंपारिक खेळाने या कार्यक्रमात लहान मुलींपासून वयोवृद्ध महिलांनी मनसोक्त आनंद लुटला.पारंपरिक खेळांनाच एक आधुनिकतेची झालर देखील चढवलेली होती, ज्यामध्ये रॅम्प वॉक, बिग बॉस क्वीझ, ट्रेंडिंग हूक स्टेप चॅलेंज यांसारख्या उपक्रमांचाही समावेश होता. रॅम्पवॉक ची मजा तर अगदी लहान मुलींपासून वयस्कर महिलांपर्यंत सर्वांनी घेतली. नेहमीच प्रपंचाच्या रहाटगाड्यातून जात असताना ,दैनंदिन जीवनात तून एक दिवस स्वतःसाठी, मनमुराद आनंद लुटण्यासाठी सर्वांनी घालवला. २०० महीलांनी “बाई पण भारी २.०” या कार्यक्रमात सहभाग नोंदविला, व या कार्यक्रमातून आनंद लुटला. या कार्यक्रमात कोणतीही स्पर्धा नव्हती होती, होती तर फक्त मनमुराद आनंद लुटण्याची मौज! या कार्यक्रमात महिलांचे स्वागत रुईच्या पानाच्या द्रोणातून चाफ्याची फुले व गजरा देऊन करण्यात आले. आपल्या घरच्या कार्यक्रमाप्रमाणे सर्वांचे वैयक्तिक स्वागत करण्याचा अभिनव उपक्रम सिस्टर स्काॅडने याही वेळी राबविला. उपस्थित महिलांचे वेलकम ड्रिंक, अल्पोपहार, पान शॉट व व्हेज बिर्याणी सह मेजवानी चे रुचकर नियोजन केले होते. या कार्यक्रमात सर्वच महिलांनी स्वतःला विसरून सर्वच खेळाचे उपक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमाची रंगत वाढवली. हा कार्यक्रम सिस्टम स्काॅडच्या संचालिका नयन सोळांकुरे व मयुरी सोळांकुरे तसेच सर्व तरुण व उत्साही टीम मेंबर्स नी उत्कृष्ट नियोजन केले, याच प्रकारे भविष्यात टिपऱ्यांचा कार्यक्रम, ख्रिसमस कार्यक्रम, रंगपंचमी कार्यक्रम, यासारखे विविध कार्यक्रम राबविण्याचे नियोजित असून महिला व फॅमिली साठी विविध उपक्रम राबवून कोल्हापूरमध्ये एक आगळावेगळा इव्हेंट कार्यक्रम च्या माध्यमातून मनोरंजन करण्याचा स्तुत्य उपक्रम वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे या ग्रुपच्या संचालिका कु. नयन महावीर सोळांकुरे यांनी मनोगत व्यक्त केले.