प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा दिल्ली : दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांच्या निकटवर्तीय आतिशी आज २१ सप्टेंबर रोजी शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अरविंद केजरीवाल यांचा राजीनामा स्वीकारला आहे. तसेच ५ मंत्र्यांच्या नियुक्तीलाही मान्यता दिली. आज दिल्लीतील राज निवास येथे आतिशी यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. राष्ट्रपती कार्यालयाकडून यासंदर्भात अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर आज शनिवार दि २१ संप्टेबर रोजी दुपारी किंवा संध्याकाळी शपथविधी सोहळा होईल.आम आदमी पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास हा शपथविधी सोहळा होऊ शकतो. मात्र, आतिशी या मंत्रिमंडळासोबत शपथ घेणार की नाही हे स्पष्ट झालेले नाही.आतिशी यांना मुख्यमंत्रिपदावर नियुक्त करण्यास परवानगी देण्याबरोबरच राष्ट्रपतींनी ५ मंत्र्यांच्या नियुक्तीलाही परवानगी दिली आहे. आज २१ संप्टेबर रोजी होणाऱ्या शपथ विधी सोहळ्यात सौरभ भारद्वाज, गोपाल राय, कैलाश गेहलोत, इम्रान हुसैन आणि मुकेश अहलावत हे मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.केजरीवाल यांचा राजीनामा स्वीकारण्याबाबत राष्ट्रपती कार्यालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की, ‘राष्ट्रपतींनी राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा तत्काळ स्वीकार केला आहे. मात्र, नवे मुख्यमंत्री शपथ घेईपर्यंत ते राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील.आतिशी यांच्या शपथेबाबत जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये असे लिहिले आहे की, ‘राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांनी आतिशी यांना शपथ दिल्याच्या तारखेपासून दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील.