वसुंधरा अभियान अंतर्गत सायबर वुमन्स कॉलेज येथे ”बेस्ट फ्रॉम वेस्ट” या विषया अंतर्गत विविध प्रदर्शनाच्या स्पर्धा..

0
22

प्रतिनिधी मेगा पाटील

कोल्हापूर : सायबर महिला महाविद्यालय व कोल्हापूर महानगरपालिका पर्यावरण विभाग यांचे मार्फत दिनांक 25 सप्टेंबर रोजी माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सायबर वुमन्स कॉलेज येथे ”बेस्ट फ्रॉम वेस्ट” या विषया अंतर्गत विविध प्रदर्शनाच्या स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी ,शिवाजी युनिव्हर्सिटी पर्यावरण विभागाचे रिसर्चर चेतन भोसले यांनी संचालक म्हणून काम केले. या स्पर्धेत पर्यावरण विभाग, फूड टेक्नॉलॉजी, फॅशन डिझायनिंग, इंटेरियर डिझायनिंग विभागाच्या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. उपायुक्त पंडित पाटील, पर्यावरण अधिकारी अवधूत निर्लेकर, कॉलेजचे प्राचार्य अनिल कुलकर्णी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमास केवल लोट, स्केती शेलार, प्राध्यापिका प्रज्ञा कापडी, सीमा पाटील, प्रियांका चव्हाण व विद्यार्थी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here