कोल्हापूर दि. 30: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11.30 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने सांगलीकडे प्रयाण. दुपारी 2.45 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने श्री क्षेत्र सिध्दगिरी महासंस्थान कणेरीमठकडे प्रयाण. दुपारी 3 वाजता श्री क्षेत्र सिध्दगिरी महासंस्थान कणेरीमठ, कोल्हापूर येथे आगमन व राखीव. दुपारी 4 वाजता धर्मध्वज स्तंभाचे उद्घाटन व संत समावेश कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ: श्री क्षेत्र सिध्दगिरी महासंस्थान, कणेरीमठ, कोल्हापूर) सोयीनुसार मोटारीने कोल्हापूर विमानतळकडे प्रयाण. कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व विमानाने मुंबईकडे प्रयाण.