तणावानंतर धारावीत अनधिकृत मशिद हटवण्याचे काम सुरू

0
95

प्रतिनिधी:अभिनंदन पुरीबुवा मुंबई : धारावी येथील मेहबूब-ए-सुबानिया मस्जिदचे अनधिकृत बांधकाम हटविण्यास सुरुवात झाली असून मेहबूब-ए-सुबानिया मशिद ट्रस्टकडूनच ही मस्जिद हटवण्याचे काम सुरू आहे. सुरूवातीला महापालिकेकडून मशिद हटवण्याची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. अनधिकृत मस्जिदीवर कारवाई करण्यासाठी पालिका गेली असता विरोध झाला. या घटनेने धारावीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.दरम्यान, धारावी येथील मेहबूब-ए-सुबानिया मस्जिद अनधिकृत बांधकाम प्रकरणी ट्रस्टने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण न्यायायलयाच्या आदेशानंतर ट्रस्टने मस्जिदीतील अनधिकृत बांधकाम हटविण्याचे आश्वासन दिले होते. त्याअंतर्गत आज सोमवारी ३० सप्टेंबर रोजी मशिदीवरील अनधिकृत बांधकाम हटविण्यास सुरुवात केली आहे.मुंबईतील धारावी येथे असलेली मेहबूब-ए-सुबानिया मस्जिद ६० वर्षांहून अधिक जुनी आहे. या मस्जिदीला दोन वर्षांपूर्वी नोटीस पाठवण्यात आली होती. त्यावेळी या प्रकरणात कोणताही तोडगा निघाला नाही. जेव्हा ही मस्जिद बांधली गेली तेव्हा तिला ग्राउंड प्लस २ मजले होते. वाढत्या लोकसंख्येमुळे मस्जिदीमध्ये नमाज अदा करण्यासाठी एक मजला वाढवण्यात आला होता. मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी बीएमसीचे पथक आल्यावर गोंधळ झाला. हजारोंचा जनसमुदाय जमला होता. मस्जिद पाडण्यावरून मोठा गोंधळही उडाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here