प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा कोल्हापूर :कसबा बावडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे अनावरण ४ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ६ वाजता राहुल गांधी यांच्या हस्ते होणार आहे. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी राहूल गांधी हे राजर्षी शाहू समाधीस्थळ येथे भेट देणार आहेत. समाधी स्थळाचे दर्शन झाल्यानंतर ते संविधान सन्मान संमेलनाकडे रवाना होतील. राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापुरात संविधान सन्मान संमेलन होत आहे. या संमेलनासाठी १ हजार पेक्षा जास्त निमंत्रित सहभागी होणार आहेत अशी माहिती आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. राहूल गांधी यांच्या कोल्हापूर दौऱ्यांच्या निमित्ताने राज्यातील काँग्रेसचे नेते मंडळी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्नीथला, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह राज्यातील वरिष्ठ नेते मंडळी कोल्हापुरात येणाऱ असल्याचेही आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.