कोकरूड/ वार्ताहर दूध उत्पादकांनी वारणा दूध संघाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन वारणा दूध संघाचे संकलन अधिकारी अशोक पाटील यांनी केले ते कोकरूड ता. शिराळा येथे श्री. निनाईदेवी दुध उत्पादक व पुरवठा सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बोलत होते. यावेळी संस्थापक अनिलराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कोकरूड सोसायटीचे व्हा. चेअरमन बाजीराव घोडे यांनी अध्यक्षीय भाषण केले. यावेळी बोलताना अशोक पाटील म्हणाले की, दूध संघाच्या वतीने दूध उत्पादकांसाठी कडबाकूट्टी, दूध काढणे मशीन अशी अनेक साधणे तसेच दूध संघा मार्फत विमा योजना, आपदग्रस्त मदत आणि विशेष योजना रेडी संगोपन योजना अश्या अनेक फायदेशीर योजना राबविण्यात येत आहेत. तसेच निनाईदेवी दुध संस्थेकडून दुध उत्पादकांना बिनव्याजी ॲडव्हाॅन्स देण्यात येत आहे. ही बाब कौतुकास्पद आहे. याप्रसंगी श्री. निनाईदेवी दूधसंस्थेस वर्षभरात म्हैस दूध पुरवठा करणाऱ्या पहिले पाच दुध उत्पादक अमर मुलाणी, संजय करुंगलेकर, जयसिंग घोडे, बाबुराव नांगरे, मनिषा लाकोळे तसेच गाय दूध पुरवठा मध्ये संजय कोळापटे, राजेंद्र माने,आशा घोडे, सुरेश काकडे, शरद गोधडे यांना सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेच्या स्थापना वेळेचे प्रथम दूध उत्पादक दिनकर घोडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी दुध संस्थेचे चेअरमन शामराव मोहिते, व्हा. चेअरमन सुभाष सुतार आदींसह सर्व संचालक, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत शंकर पाटील यांनी तर आभार संचालक नागनाथ कुंभार यांनी मानले. फोटो ओळी: कोकरुड येथे दूध उत्पादकांना मार्गदर्शन करताना दूध संकलन अधिकारी अशोक पाटील, शेजारी अनिलराव देशमुख, शामराव मोहिते, सुभाष सुतार, बाजीराव घोडे व अन्य (छाया प्रतापराव शिंदे)