*प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा कोल्हापूर : छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य संघटनेला निवडणूक आयोगाकडून पक्षाचा दर्जा देण्यात आला असून ” महाराष्ट्र स्वराज्य पक्ष असं नविन नामकरण करण्यात आले आहे. पक्षाला सप्तकिरणासह निब चिन्ह निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाले असल्याची माहिती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.