द रॉयल फायनान्स कन्सल्टन्सी व सर्व्हिसेस प्रा.लि. शाखेचे उद्घाटन समारंभ मोठ्या दिमाखात संपन्न..

0
467

प्रतिनिधी मेघा पाटील

हातकणंगले / कोल्हापूर :द रॉयल फायनान्स कन्सल्टन्सी व सर्व्हिसेस प्रा.लि. शाखेचे उद्घाटन समारंभ मोठ्या दिमाखात संपन्न झाले. आज घटस्थापनेचे औचित्य साधून द रॉयल फायनान्स कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड शाखेचे दिग्गज मान्यवरांच्या शुभहस्ते उद्घाटन समारंभ संपन्न झाला. या कन्सल्टन्सी च्या माध्यमातून शासकीय योजना सबसिडी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गरजू युवा उद्योजक यांना विविध शासकीय योजनेअंतर्गत आर्थिक फायनान्स उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या फायनान्स कंपनीचे ऑनर रोहित डवरी व बाहुबली भोसे हे आहेत. हे कन्सल्टन्सी चे काम पाहणार आहेत. कार्यक्रमा वेळी अनेक दिग्गज लोकांनी आपले मनोगत व्यक्त केले.

रोहित डवरी हे या कन्सल्टसीचे मालक असून ते एका शेतकरी कुटुंबातील आहेत. आत्तापर्यंतच्या खडतर प्रवासा करत त्यांनीही आपली प्रतिमा समाजामध्ये एक चांगली प्रस्थापित केली आहे. रोहित डवरी यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे. ते समाजामध्ये सांप्रदायिक मध्येही ते सहभागी असतात… कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी भजन कीर्तनाचे कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो. खोची या गावातील त्यांचे भजनी मंडळ आहे. या भजन कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधनाचे काम उत्तम प्रकारे करत असतात. सामाजिक व सांप्रदायिक याबरोबरच द रॉयल फायनान्स कन्सल्टन्सी व सर्विसेस च्या माध्यमातून लोकांना उद्योग व्यवसायासाठी वेगवेगळ्या बँकेच्या माध्यमातून आर्थिक बळ देण्याचे काम करणार आहेत.

त्यांच्यासोबत पार्टनर म्हणून या कन्सल्टन्सी शाखेमध्ये बाहुबली भोसे हे सोबत काम करणार आहेत. त्यांचाही या क्षेत्रात मोठा अनुभव आहे.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध इतिहास संशोधक व वक्ते अरुणजी घोडके SP-9 मराठी माध्यम समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर सागर पाटील यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून फीत कापण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थिती स्वराज्य ग्रुप महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष शेखर पाटील भैय्यासाहेब, निर्गुण सोल्युशन चे मालक अक्षय पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस युवा अध्यक्ष हर्षवर्धन चव्हाण, प्रदेश महासचिव मानवाधिकार अनिल केदारी, युवराज येडुरे, तानाजी कुडित्रेकर, सुशांत पोवार, सौ.तनुजा बाहुबली भोसे, सौ. मुक्तारोहित डवरी, बाबासो भोसे आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here