SP-9 प्रतिनिधी मेघा पाटील
कोल्हापूर प्रतिनिधी :अन्न आणि कृषी संघटना यांचे मार्फत जागतिक अन्न दिन दर वर्षी १६ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येतो. ह्या वर्षीचा विषय आहे, “Right to food for a better lifd a better future”. याचा अर्थ आहे की, सर्व लोकांना पुरेसं अन्न मिळण्याचा अधिकार असावा. हवा आणि पाण्यानंतर अन्न हे मानवाची तिसरी सर्वात मूलभूत गरज आहे, तसेच पौष्टिक आणि शुद्ध आहार हा निरामय जीवनासाठी अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे विविध आजारांना वेळीच आळा बसू शकतो . जागतिक अन्न दिनाच्या निमित्ताने कॉलेज ऑफ नॉन-कन्व्हेंशनल व्होकेशनल कोर्सेस फॉर वूमन येथे, फुड टेक्नॉलॉजी विभागामार्फत विद्यार्थिनी ,शिक्षक वर्ग व शिक्षकेतर वर्ग यांच्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. अन्ना विषयीची जागरूकता निर्माण करणे हा उद्देश ठेवून गेस्ट लेक्चर तसेच रील , क्वीझ, पॅकेजिंग अँड लॅबेल्लिंग फॉर इंनोवेटीव्ह फुड प्रॉडक्ट्स, वॉल पेपर डिस्प्ले, लोगो डिझाईन इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा उदघाटन समारंभ आज संपन्न झाला. मॅनॅजमेन्ट रिप्रेसेंटेटीव्ह डॉ. ए.आर कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात प्रत्येकाने अन्नाची नासाडी थांबवण्यासाठी प्रयत्न केले तर संयुक्त राष्ट्राने केलेले शून्य भुकेचे उद्दिष्ट गाठणे शक्य होईल असे नमूद केले . या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन विभाग प्रमुख डॉ.निलम जिरगे व विभागातील इतर शिक्षक यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.श्वेता शहा यांनी केले.या कार्यक्रमासाठी प्रभारी प्राचार्य श्रीमती प्रज्ञा कापडी व संस्थेचे प्रेसिडेंट व मॅनेजिंग डॉ.आर.ए शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमास सर्व विभाग प्रमुख, विद्यार्थीनी, शिक्षक व शिक्षकेत्तर वर्ग उपस्थित होते.