लिटिल नेमो ऑफ प्रीस्कूल आणि मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलच्या समृद्धीचे आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये घवघवीत यश…

0
335

कोल्हापूर/ फुलेवाडी :लिटिल नेमो ऑफ प्रीस्कूल आणि मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलच्या समृद्धी विशाल चौगुले हिने आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये घवघवीत यश यश संपादन केले. नुकतेच श्रीलंका येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत समृद्धी विशाल चौगुले हिने कात या प्रकारात सुवर्णपदक आणि कुमीते या प्रकारात कांस्यपदक प्राप्त करून शाळेचा नावलौकिक वाढवला आहे. श्रीलंका येथे झालेल्या इंडो कराटे स्पर्धेसाठी एकूण 800 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या स्पर्धेसाठी भारतातून 17 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.

या स्पर्धेमध्ये काता आणि कुमीते प्रकारच्या लढती होत्या. स्पर्धेमध्ये भारतीय स्पर्धकांनी 11 सुवर्णपदक व 13 रौप्य पदक त्याचबरोबर 9 कास्यपदक आपल्या भारत देशाला मिळवून देत स्वतःला गौरवाचे मानकरी बनवले.लिटिल नेमो ऑफ प्रीस्कूल आणि मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलची समृद्धी विशाल चौगुले ही भारतात परतल्यावर तिचे शाळेच्या व पालकांच्या वतीने जोरात स्वागत करून तिचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

शाळेच्या प्रिन्सिपल जेनिफर डिसोजा यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. समृद्धीच्या यशामध्ये शाळेच्या प्रिन्सिपल जेनिफर डिसूजा, प्रशिक्षिका सुषमा पिसाळ,रमेश पिसाळ, ओंकार गदगदे,शाळेचे सर्व शिक्षिका व शिक्षक, पालक वर्ग यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

2022 साली नेपाळ येथे झालेल्या कराटे स्पर्धेसाठी गेलेले लिटिल नमो स्कूलचे विद्यार्थी यांनीही गोल्ड मेडल संपादन करून शाळेच्या शिरपेच्यात मानाचा तुरा संपादन केला होता. हे यश संपादन करत असताना कोरोना काळाचा सावट होता. अशा परिस्थितीत सुद्धा या स्पर्धेसाठी गेलेले राजवीर राजेंद्र पाटील आणि समृद्धी सागर पाटील यांनी गोल्ड मेडल घेऊन शाळेचे नाव एका उंच शिखरावर नेऊन ठेवले. या शाळेचे वैशिष्ट्य हेच आहे की मुलांना शैक्षणिक बरोबर कला क्रीडा साठी खूप प्रोत्साहित केले जाते. अशा अनेक जिल्हास्तरीय राज्यस्तरीय,राष्ट्रीय स्तरीय विविध स्पर्धेमध्ये भाग घेण्यास विद्यार्थी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित व मार्गदर्शन प्रिन्सिपल जेनिफर डिसूजा ह्या करत असतात. हळूहळू या स्कूलचे नाव संबंध कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एका वेगळ्या उंचीवर जाण्याचा प्रयत्न करत असताना दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here