छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली

0
102

प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा

छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील एका विवाहीत महिलेचा देश विघातक कृत्यांमध्ये सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस सर्तक झाले असून, एटीएसकडून या महिलेचा शोध सुरू आहे.

घटना समोर येताच शहरात खळबळ उडाली आहे.घटनेबाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगरच्या सिडकोतील एका व्यावसायिकाची पत्नी डिसेंबर 2022 मध्ये पाकिस्तानी तरुणासोबत पळून गेली होती.

ती त्याच्यासोबत पाकिस्तानातून सौदी अरेबिया व नंतर लिबियामध्ये गेली. दरम्यान 3 ऑगस्टला ती पुन्हा देशात परतली.त्या दरम्यान तिचा काही आतंकवादी संघटनांसोबत संपर्क आला असून, देशविघातक कृत्यांमध्ये तिचा सहभाग असल्याचा ई-मेल पोलिसांना प्राप्त झाला आहे.

या मेलमुळे गुप्तचर यंत्रणा सर्तक झाली असून, एटीएस या महिलेचा शोध घेत आहे. या प्रकरणात महिलेच्या कुटुंबीयांची चौकशी सुरू असल्याची माहिती वरिष्ठ सुत्रांकडून मिळत आहे.

मूळ मालेगावच्या असलेल्या या 24 वर्षीय महिलेचे सिडकोतील एका व्यावसायिकासोबत 2011 मध्ये लग्न झाले. 2022 मध्ये ती वडिलांसोबत सौदीमध्ये गेली होती. त्या दरम्यान तिची एका पाकिस्तानी तरुणासोबत ओळख झाली.

देशात परत आल्यानंतरही ती त्याच्या संपर्कात होती. सोशल मीडियावरून ओळख वाढली, ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर या तरुणीने डिसेंबर 2022 मध्ये भारत सोडला.

ती पाकिस्तानात पोहोचली.याप्रकरणी पतीच्या तक्रारीवरून सिडको पोलीस ठाण्यात संबंधित महिला बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती. मात्र आता 18 ऑगस्टला पोलिसांना एक मेल आला आहे. या मेलमधून काही गंभीर बाबी समोर आल्या आहेत.

संबंधित महिलेनं डिसेंबरमध्ये भारत सोडला आणि त्यानंतर तीने जानेवारीमध्ये पाकिस्तानी तरुणासोबत लग्न केल्याची माहिती देखील समोर आली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या महिलेने लग्न केल्याचे काही फोटो देखील तिच्या पहिल्या पतीला मिळाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here