कोल्हापूर – मातंग समाज संघटना व कला क्रीडा शैक्षणिक सांस्कृतिक ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित पुरस्कार सोहळा संपन्न

0
129

प्रतिनिधी: प्रदीप आवघडे

कोल्हापूर जिल्हा मातंग समाज संघटना व मातंग कला ,क्रीडा,शैक्षणिक व सांस्कृतिक ट्रस्ट याच्या संयुक्त विद्यामाने दसरा चौकातील शाहु स्मारक भवन येथे पुरस्कार सोहळ्याचे रविवार 27 ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले होते.


तसेच विविध क्षेत्रातील मान्यवराचा आदर्श गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सोबतच गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार सोहळा देखील संपन्न झाला या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रवक्ते राजीव आवळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

यांच्या सह
जिल्हा परिषद मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल आकुर्ड ,डेमोक्रॅटिक पार्टी आँफ इंडियाचे अध्यक्ष प्रा.सुकुमार कांबळे,मातंग ट्रास्टचे अध्यक्ष शामराव शेंडगे,सचिव विलास मंगल, संदीप कवाळे,संजय वाघ,संजय दाभाडे,प्रा.रविंद्र पाटोळे,क्रांती सप्रे, यांच्या सह गुणवंत विद्यार्थी व समाजातील समाजबांधव उपस्थित होते.

मातंग क्रीडा, कला, शैक्षणिक व सांस्कृतिक ट्रस्ट कोल्हापूर व कोल्हापूर जिल्हा मातंग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने
पुरस्कार वितरण सोहळ्यात पुरस्कार प्राप्त समाजबांधव व त्यांना मिळालेला पुरस्कार आदर्श शिक्षक पुरस्कार श्री शहाजी पांडुरंग शिंदे कावणे ता करवीर जि. कोल्हापूर, जीवन गौरव पुरस्कार श्री शामराव भाऊ शेंडगे. गोकुळ शिरगाव ता. करवीर जि कोल्हापूर, आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार
श्री कृष्णा सोमाना माने भाषणे ता. करवीर जि कोल्हापूर, समाजभूषण पुरस्कार


श्री गोपाळ आकाराम साठे मल्हार पेठ ता पन्हाळा जिल्हा कोल्हापूर, आदर्श साहित्यिक पुरस्कार
श्री महेंद्र रामचंद्र पाटोळे कौलव ता राधानगरी जि कोल्हापूर,


विशेष पुरस्कार
श्री शशिकांत शिवाजी घाटगे जांभळी ता शिरोळ जि कोल्हापूर,महिला रत्न पुरस्कार
सौ मीना शशिकांत जाधव
हूपरी ता हातकणंगले जिल्हा कोल्हापूर, सांस्कृतिक व कला पुरस्कार नामदेवराव देसाई (एन डी) आनूर ता कागल जि कोल्हापूर यांना देण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी आदरणीय शामराव शेंडगे सर,रमेश तिळवे सर,दिलीप चौगले सर,संभाजी पाटोळे सर,राजू दाभाडे सर,तसेच कोल्हापूर जिल्हा मातंग समाजाचे सर्व पदाधिकारी यांनी या कार्यक्रमाचे अतिशय उत्कृष्ट असे नियोजन केले होते…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here