कागल तालुक्यातील चिमगांव येथे विविध विकास कामाचा भुमीपुज शुभारंभ संपन्न ..

0
185

कागल प्रतिनिधी: अभिनंदन पुरीबुवा

महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री नामदार हसनसो मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून चिमगांव येथील विठ्ठल मंदिर स्थळी होणाऱ्या हॉलच्या पायाभरणी व दोन अंगणवाडी पायाभरणी शुभारंभ सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन व गोकुळ दूध संघाचे संचालक श्री.नविद मुश्रीफ यांच्या शुभहस्ते हस्ते संपन्न झाला.

या पायाभरणी शुभारंभ प्रसंगी नविद मुश्रीफ म्हणाले, चिमगांव गावाच्या सर्वांगीण विकासासाठी जे काही करता येईल,ते करण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे. भविष्यात सरपंच आणि सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून जी विकासाची अपूर्ण राहिलेली कामे आहेत, ते पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.


यावेळी लोकनियुक्त सरपंच दिपक आंगज, उपसरपंच आनंदा चौगले सदस्य सागर भोई, आनंदा करडे, कविता करडे, संगिता फराकटे, अस्मिता चौगले, संजय एकल, सोनाली मांगले, रेश्मा नाईक, व तानाजी एकल, नामदेव मांगले, राजेंद्र एकल, एकनाथ एकल,यशवंत आंगज, उत्तम एकल, यांच्या सह पत्रकार अभिनंदन पुरीबुवा, पत्रकार प्रदीप आवघडे, पदाधिकारी, वारकरी व गांवातील ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here