काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधूरीमाराजे छत्रपती यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे.

0
158

SP-9 News प्रतिनिधी अभिनंदन पुरीबुवा

कोल्हापूरच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; सतेज पाटलांना मोठा धक्का; काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधूरीमाराजे छत्रपती यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे.* विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. कारण आता कोल्हापूरच्या राजकारणात मोठा ट्विस्ट झाला आहे. काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या आज शेवटच्या दिवशी कोणत्याही प्रकारची पुर्व सुचना न देता उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार सतेज पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.कोल्हापूर उत्तर विधानसभेसाठी काँग्रेसचे बंडखोर राजू लाटकर यांनी त्यांचा अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे आता मधुरिमाराजे यांनी त्यांचा अर्ज मागे घेतल्याची चर्चा रंगली आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभेसाठी सुरूवातीला काँग्रेसचे माजी नगरसेवक राजू लाटकर यांचे नाव जाहीर केलं होतं.मात्र त्यानंतर अवघ्या २४ तासांमध्ये काँग्रेसने त्यांचा उमेदवार बदलला होता. त्यानंतर मधुरिमाराजे छत्रपती यांचे नाव जाहीर करण्यात आलं होत. मात्र त्यानंतर राजू लाटकर यांनी अपक्ष अर्ज भरला होता.अशातच आता शेवटच्या क्षणापर्यंत राजू लाटकर यांची मनधरणी करण्यात काँग्रेसच्या नेत्यांना यश आलं नाही. त्यामुळे राजू लाटकर हे विधानसभा निवडणूक लढवण्यास ठाम होते. अशातच शेवटच्या क्षणी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे.मधुरिमाराजे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर कोल्हापूरचे खासदार शाहू महाराजांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “नाईलाजाने मधुरिमाराजेंना माघार घ्यावी लागली आहे, कारण राजेश लाटकर यांनी माघार घेतली नाही, मात्र ते एक चांगले कार्यकर्ते आहेत, त्यामुळे आम्ही ठरवलं की अशा परिस्थितीत निवडणूक लढायचं नाही.”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here