कोल्हापूर, दि. 10 : विधानसभा निवडणूका सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक कामांसाठी नियुक्त सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करा, अशा सूचना निवडणूक निरीक्षक मीर तारीक अली यांनी दिल्या.निवडणूक निरीक्षक मीर तारीक अली यांनी 275 करवीर विधानसभा मतदारसंघाच्या प्रशिक्षण सत्रात उपस्थित राहून निवडणूक अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा शिंगण, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रुपाली रेडेकर, बी.जी.गोरे, सोनाली माडकर व अलमास सय्यद उपस्थित होते. श्री. अली म्हणाले, निवडणूका भयमुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पडण्यासाठी निवडणूक प्रक्रिया समजून घेवून आपापली कर्तव्ये आणि सोपविलेल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडा. विधानसभा निवडणूक 2024 च्या प्रक्रियेत मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या, कर्तव्य, मतदान प्रक्रियेतील टप्पे, निवडणूकीतील महत्वाचे बदल समजून घ्या. वेळोवेळी प्रशासनाने दिलेल्या सूचानांची गांर्भीयाने दखल घेऊन त्याप्रमाणे जबाबदाऱ्या पाडा. चिन्हांकित मतदार यादी तपासणी, मतदान यंत्र (EVM), तपासणी, मतदान यंत्रांची (BU) तपासणी, मतदानाच्या आदल्या दिवशी मतदान केंद्रावरील पूर्व तयारी, मतदान केंद्राची उभारणी, आदर्श मतदान केंद्राची रचना, मतदान केंद्रावरील सुरक्षा व्यवस्था, संवेदनशील मतदान केंद्राबाबत, मतदान केंद्रावर आंतरजालावरुन प्रक्षेपणाचा वापर (वेबकॉस्टिंग), दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा, अंध, अपंग मतदारांकडून मतदान, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ओळख व जोडणी प्रक्रिया. मतदार पडताळणी योग्य कागदी परिनिरीक्षण निशाणी (VVPAT), अभिरुप मतदान (मॉकपोल) चिठ्या सिल करणे, मतदार यंत्र मोहोरबंद करणे, याचबरोबरच निवडणूकीची संपूर्ण कार्यपध्दती समजून घ्या, असेही त्यांनी सांगितले.
Home Uncategorized निवडणूका सुरळीत पार पाडण्यासाठी समन्वयाने काम करा – निवडणूक निरीक्षक मीर तारीक...