जिल्ह्यात 27 नोव्हेंबरपर्यंत बंदी आदेश जारी

0
27

प्रतिनिधी मेघा पाटील

कोल्हापूर, दि. 14 (जिमाका) : जिल्ह्यात यात्रा, सण, उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होणार आहेत तसेच विविध पक्ष संघटना यांच्याकडुन त्यांच्या विविध मागण्यांकरीता आंदोलन, उपोषण, मोर्चा इ. प्रकारची आंदोलने करण्यात येतात तसेच विधानसभा निवडणुक 2024 च्या अनुषंगाने आचारसंहिता लागू झाली असुन विविध पक्षाकडून रॅली, सभेचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान व दि. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पाडणार असून या कालावधीत दोन पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांच्या समोरासमोर येवुन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1), (अ) ते (फ) आणि कलम 37 (3) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी दिनांक 14 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 6 वाजल्या पासून ते दिनांक 27 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 24 वाजेपर्यंत बंदी आदेश जारी केला आहे.

हा हुकूम ज्या सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना त्यांची कर्तव्य अधिकार बजाविण्या संदर्भात कामकाज करताना उपनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक, कोल्हापूर अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे, अशा व्यक्तींना, तसेच सर्व जाती धर्माचे सण / उत्सव / जयंती / यात्रा, इ. हे शांतता मय मार्गाने साजरे करण्याकरीता जमा होणारा जनसमुदाय यांना व लग्न, इतर धार्मिक समारंभ, सण, यात्रा, प्रेतयात्रा इत्यादी यांना लागू असणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here