स्वीप अंतर्गत माता पालकांना मतदानाविषयी मार्गदर्शन

0
13

प्रतिनिधी मेघा पाटील

कोल्हापूर, दि. 14 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने SVEEP अर्थात systematic voter’s education and electoral participantion म्हणजेच मतदारांचा निवडणुकीतील सहभाग वाढवण्यासाठी निर्वाचन आयोगामार्फत हा कार्यक्रम राबविला जातो. निवडणूक निर्णय अधिकारी, 274 कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी करवीर विभाग कोल्हापूर यांच्या वतीने परिसरातील नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. SVEEP पथकाच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्याकरीता कविता चौगुले, मोबाईल क्रमांक 8830959739 नोडल अधिकारी SVEEP पथक यांच्या पथकाच्या माध्यमातून मतदार जनजागृती कार्यक्रम अंतर्गत 274 कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघामधील माता पालकांना मागदर्शन केले जात आहे.माता पालक व परिसरातील अन्य नागरिकांना प्रत्येक मताचे महत्त्व, मतदान हा हक्क व कर्तव्य, नागरिक म्हणून त्यांच्या निवडणूक पर्वातील जबाबदारी या विषयावर निवडणूक विभागामार्फत माहिती दिली जात आहे. मतदानावेळी पालन करावयाच्या बाबी, घ्यावयाची काळजी या विषयीही मार्गदर्शन करण्यात येत आहे.SVEEP अंतर्गत कात्यायनी कॉम्प्लेक्स कळंबा पूर्व, सुर्वे नगर, दादू चौगुले नगर, प्रथमेश नगर, विक्रम नगर, टेंबलाईवाडी या परिसरातील अंगणवाडीमध्ये उपस्थित माता पालक व नागरिकांना SVEEP नोडल अधिकारी यांच्याद्वारे माहिती देण्यात आली. या वेळी अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस सहभागी झाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here