जिल्ह्यातील दहा मतदार संघात आजपासून गृहमतदानाला सुरुवातपहिल्या दिवशी 2559 दिव्यांग आणि जेष्ठ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

0
11

प्रतिनिधी मेघा पाटील

कोल्हापूर, दि. 14: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या गृहमतदानाला आज सुरुवात झाली. गृहमतदानाच्या पहिल्या दिवशी 2559 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. भारत निवडणूक आयोगाने 85 वर्षांपुढील व दिव्यांग मतदार जे मतदान केंद्रापर्यंत जाऊ शकणार नाहीत. त्यांच्यासाठी गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदार संघातील 85 वर्षांपेक्षा जास्त वयाचे, दिव्यांग मतदारांची नोंद करून अर्ज भरून घेतले आहेत. यापैकी मतदान केंद्रात जावून मतदान करणे शक्य नसलेल्या मतदारांची संख्या 4 हजार 601 एवढी आहे. यात 85 वर्षावरील 3 हजार 870 मतदार असून 731 दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. या सर्व गृहमतदारांच्या मतदानाला आज सुरुवात झाली. आज झालेल्या मतदानात 383 दिव्यांग , 2168 जेष्ठ आणि 8 कोविड रुग्णांचा समावेश होता.

गृह मतदानासाठी जिल्ह्रयातील दहा मतदार संघात सर्व दिव्यांग व वृद्ध मतदारांच्या घरी जावून विधानसभा मतदार संघनिहाय दि.16 नोव्हेंबर पर्यंत मतदान घेतले जाणार आहे. त्यासाठी 209 पथके तयार करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघातील ज्या 85 वर्षावरील व दिव्यांग मतदारांनी गृह मतदानासाठी नोंद केली आहे त्यांनी याची नोंद घेऊन आपला मतदानाचा पवित्र हक्क बजवावा व लोकशाही बळकट करण्यासाठी आपला हातभार लावावा,असे आवाहनही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here