पुणे PRO – राहुल पवार
पुणे प्रतिनिधी : पुणे येथे पीवायसी हिंदू जिमखाना आयोजित डॉ. प्रमोद मुळे स्मृती प्रौढांचे राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धा – 2024 संपन्न झाली. अजय कोठावळे अमित श्रॉफ केदार कसबे कर प्रकाश पंजाबी यांनी पीवायसी हिंदू जिमखाण्या तर्फे आयोजित डॉक्टर प्रमोद मुळे स्मृती करोडांच्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेचे आपापल्या गटातून विजेतेपद पटकावले. पुरुषांच्या 59 हुन अधिक वयोगटाच्या अंतिम लढतील पुण्याच्या अजय कोठावळे यांनी मुंबई उपनगराच्या कपिल कुमार वर 13 – 11, 19 – 9, 11 – 9 असा विजय नोंदवला. तसेच पुरुषांच्या 64 हून अधिक वयोगटाच्या अंतिम लढतीत प्रकाश पंजाबी यांनी मुंबई शहराच्या जयंत कुलकर्णीचा 13- 11, 6 12, 10 – 12 असा पराभव केला व जेतेपद मिळवले. पुरुषांच्या 39 हुन अधिक वयोगटाच्या अंतिम लढतीत मुंबई शहराच्या केदार कसबेकर यांनी मुंबई उपनगराच्या सुवास राणेवर 6- 11, 10 -12, 11 – 8,11 – 8, 11-9 अशी मात केली आणि जेतेपद मिळवले.
पुरुषांच्या 49 फोन अधिक वयोगटाच्या अंतिम लढतीत मुंबई उपनगराच्या अमित शॉप यांनी मुंबई शहराच्या प्रसाद नाईक यांच्यावर 9- 11,11- 8,12-10,11 – 8 अशी मात केली.
सांघिक स्पर्धेतील क्लेवर ग्रुपमध्ये डेक्कन स्मॅशर्स संघाने जेतेपद मिळवले. अंतिम लढतीत डेक्कन स्मॅशर्स संघाने टीम फोर्जावर 3-2 अशी मात केली. डेक्कन स्मार्स वी वी टीम फोरझा 3-2( अजय कोठावळे पराभूत वी जयंत कुलकर्णी 5 -11, 8 – 11,11-5, 11 -6,7-11: ; पराग जुवेकर वी.वी.सतीश कुलकर्णी 9 -11, 11 -2, 11-5,7-11,11-5: पराग जुवेकर – राणी तोडीवाला वी. वी. सतीश कुलकर्णी -जयंत कुलकर्णी 12-10,7-11,,11-7,11-8:; पराग जुवेकर पराभूत वि.जयंत कुलकर्णी 11-5,6-11,9-11,9-11; अजय कोठावळे वि. वि. सतीश कुलकर्णी 13-11,13-11,11-8)
उपांत्य फेरीचे काही निकाल 59 हून अधिक वयोगट : अजय कोठावळे वि. वि. पराग जुवेकर 11-1,11-5,11-4; कपिल कुमार वि. वि. विदुर पेंढारकर 11-8,11-9,11-7) 64 हून अधिक वयोगट: जयंत कुलकर्णी वि. वि.अविनाश जोशी 11-4,11-6,11-7; प्रकाश पंजाबी वि. वि. हरिष साळवी 11-7,11-9,11-8) 39 हुन अधिक वयोगट : केदार कसबेकर वि. वि. आदित्य गर्दे 13-11,11-4,11-8, सुहास राणे वि. वि.संतोष वाक्रडकर 6-11,10-12,11-8,11-8,11-9)
या स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीवायसी चे सहसचिव सारंग लागू, टेबल टेनिस विभागाचे सचिव तन्मय आगाशे, मुख्य प्रायोजक डॉक्टर विद्या मुळे,एमएसटीटीए
आणि पीडीटीटीए
चे अध्यक्ष राजीव बोडस, स्मिता बोडस, आशिष बोडस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक अविनाश जोशी, दीपेश अभ्यंकर आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन कपिल खरे यांनी केले.