प्रतिनिधी रोहित डवरी
कोल्हापूर, दि. २१ विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी दि. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत मतमोजणी अधिकारी (मोजणी पर्यवेक्षक, मोजणी सहाय्यक व सूक्ष्म निरीक्षक) कर्मचाऱ्यांची द्वितीय सरमिसळ आज जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली.
द्वितीय प्रशिक्षणासाठी जवळपास १ हजार १७४ अधिकारी, कर्मचाऱ्यांची सरमिसळ करण्यात आली. यावेळी निरीक्षक मीर तारिक अली, राम कुमार पोद्दार, श्री. गगन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे, मनुष्यबळ नोडल अधिकारी राहुल रोकडे, निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी गौरव कवाडे आणि मतमोजणी निरीक्षक VC द्वारे उपस्थित होते.
गौरव कवाडे यांनी सरमिसळबाबत सादरीकरण केले. मतमोजणी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांचे द्वितीय प्रशिक्षण २२ नोव्हेंबरला त्यांच्या नियुक्त मतदारसंघामध्ये घेण्यात येणार आहे. सुमारे १ हजार १७४ मतमोजणी अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. EVM मतमोजणीसाठी १७६ मोजणी पर्यवेक्षक, १८६ मोजणी सहाय्यक, १९६ सूक्ष्म निरीक्षक आणि पोस्टल मतपत्रिका मतमोजणीसाठी १५४ मोजणी पर्यवेक्षक, ३०८ मोजणी सहाय्यक, १५४ सूक्ष्म निरीक्षक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
000