कोकरूड : प्रतापराव शिंदे शिराळा विधानसभा मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या लढतीत महायुतीचे भाजपचे उमेदवार सत्यजित देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक पराभव करून विजयश्री मिळविला. सत्यजित देशमुख यांच्या विजयाने शिराळा पश्चिम भागातील गावागावात कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतिशबाजी करत गुलालाची उधळण कर जल्लोष सुरू केला. विधानसभा निवडणुका जाहीर होताच सत्यजित देशमुख यांना तिकीट मिळाल्यापासून गावागावात वातावरण तापले होते. स्वगीॅय. शिवाजीराव देशमुख यांच्या स्वप्नासाठी बिळाशी, चिंचोलीसह अनेक गावातील तरुणाई एकवटली होती. . शिराळा विधानसभा मतदारसंघातील जनतेनेच ही निवडणूक हातात घेऊन सत्यजित देशमुख यांचा विजय खेचून आणला आहे.
यावेळी सत्यजित देशमुख यांच्या कोकरूड यावेळी हिरा निवासस्थानी देशमुख परिवाराने साखर- पेढे वाटून, गुलालाची उधळण करित आनंद साजरा केला.दरम्यान सकाळी हिरा निवासस्थानी गुढी उभारून गुढीचे पुजन डॉ. शिल्पाताई देशमुख, रेणुकादेवी देशमुख व देशमुख परिवारातील अन्य महिलांनी केले. यावेळी डॉ. शिल्पाताई देशमुख, रेणुकादेवी देशमुख, साईतेजस्वी देशमुख, निनाईदेवी कारखान्याचे माजी चेअरमन फत्तेसिंगराव देशमुख, सूरेखादेवी देशमुख, उर्मिलादेवी देशमुख, इंद्रजित देशमुख, विश्वजित देशमुख , धैर्यशील देशमुख तृप्तीताई देशमुख, स्वातीताई देशमुख, दीप्तीताई देशमुख, ज्योतीताई देशमुख, प्रितीताई देशमुख, कोकरूडच्या सरपंच अनिता देशमुख, उज्वला देशमुख, सुवर्णाताई नांगरे, प्रभादेवी सरनोबत, सुनीताताई शिंदे, सुनील शिंदे, करण चव्हाण. आदी उपस्थित होते. तर शिराळा येथे सह्याद्री खरेदी विक्री संघात जिल्हा परिषद सदस्य संपतराव देशमुख, अनिलराव देशमुख, अनिकेत देशमुख, सुजित देशमुख, विकास देशमुख,सुहास देशमुख, सचिन देशमुख, सुजय देशमुख , राजवर्धन देशमुख, हर्षवर्धन देशमुख , विकास नांगरे,उपसरपंच अंकुश नांगरे, मोहन पाटील, प्रा. ए. सी. पाटील, श्रीरंग नांगरे, पोपट पाटील, सुरेश घोडे, भरत नांगरे, सचिन घोडे, तोसिफ मकानदार, अमीर मुलाणी, सुभाष सुतार आदींसह शिराळा पश्चिम भागातील अनेक कार्यकतेॅ मोठ्या संख्येने उपस्थित होते.