प्रतिनिधी: अभिनंदन पुरीबुवा
महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारी बातमी आहे. घरगुती वापराच्या सिलिंडरची किंमत आता 200 रुपयांनी स्वस्त होणार आहे. केंद्र सरकारकडून घरगुती वापराच्या सिलिंडरवर 200 रुपये सबसिडी देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
उज्वला योजनेंतर्गत येणाऱ्या ग्राहकांना या सबसिडीचा फायदा होणार आहे. केंद्राकडून मिळणाऱ्या सबसिडीमुळे घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची किंमत दोनशे रुपयांनी स्वस्त होणार आहे.
महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भाजापासून ते अन्नधान्यांपर्यंत आणि पेट्रोल-डिझेलपासून ते गॅस सिलिंडरपर्यंत सर्वच वस्तुंचे दर गगनाला भिडले आहेत. दर वाढल्यानं गृहिणीचं बजेट कोलमडलं आहे.
मात्र वाढत्या महागाईत दिलासा देण्याचा प्रयत्न आता केंद्र सरकारकडून सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. याचा एक भाग म्हणून आता घरगुती वापराच्या सिलिंडरवर दोनशे रुपये सबसिडी देण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे.
यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.सध्या घरगुती वापराच्या सिलिंडरचे दर प्रति सिलिंडर 1100 ते 1200 रुपये एवढे आहेत. गॅसवर दोनशे रुपयांची सबसिडी मिळाल्यास गॅस सिलिंडरचे दर प्रति सिलिंडर एक हजार रुपये एवढे होऊ शकतात.