विधानसभा 2024 निवडणुकीत मा. सांस्कृतिक मंत्री मा. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी घवघवीत यश मिळवले त्यानिमित्ताने अ.भा.म. चित्रपट निर्माता महामंडळ यांचे अध्यक्ष देवेंद्र मोरे आणि कार्याध्यक्ष बाळासाहेब गोरे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन अभिनंदन केले.
मा. मुनगंटीवार साहेब मावळत्या सरकार मध्ये सांस्कृतिक मंत्री असताना अनुदानास अपात्र ठरविण्यात आलेल्या चित्रपटांना अनुदान पात्र ठरवून प्रत्येकी दहा लाख रुपये अनुदान अ.भा.म. चित्रपट निर्माता महामंडळ यांच्या प्रयत्नातून वितरण केले.आज अभिनंदन करतांना त्यांनी वेळेअभावी निर्णय होऊनही करोना महामारीमुळे नुकसान झालेल्या मराठी चित्रपट निर्माता यांना सहानुभूतीने सरसकट अनुदान देऊ शकलो नसल्याची खंत व्यक्त केली परंतु नवीन मंत्रीमंडळ स्थापन झाल्यानंतर करोना कालावधी मध्ये दाखल प्रस्ताव पैकी अनुदानास अपात्र ठरविण्यात आलेल्या सर्व चित्रपटांना अनुदान देण्याची घेतलेल्या निर्णयांची त्वरित अंमलबजावणी करणार असल्याचे सांगितले.*मराठी चित्रपट निर्मात्यांना न्याय हाच ध्यास!