प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा नवी दिल्ली : २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान देशाची राजधानी दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनासाठी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिले आहे. त्यामुळे संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. सत्तर वर्षानंतर अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होत आहे.शरद पवार हे या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांनी पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रमुख अतिथी म्हणून साहित्य संमेलनाला उपस्थित राहण्याची विनंती केल्याची माहिती समोर येत आहे. ३७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन तात्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केले होते. दरम्यान मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. हा निर्णय विधानसभा निवडणुकीपूर्वीच घेण्यात आला होता. त्यामुळे शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साहित्य संमेलनाला उपस्थित राहण्याची विनंती केली आहे.