प्रतिनिधी मेघा पाटील
कोल्हापूर, दि. 18 (जिमाका): दिव्यांगांकरिता नॅशनल करिअर सर्व्हिस सेंटर, मुंबई आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, कोल्हापूर येथे सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेंपर्यंत दिव्यांगासाठी माहिती मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त जमीर करीम यांनी दिली आहे.
या मेळाव्यात RPWD कायदा 2016 अंतर्गत दिव्यांग व्यक्तींची ओळख आणि केंद्र ओळखपत्र वाटप करण्यात येणार आहे. तसेच वैयक्तिक मुलाखतीद्वारे व्यावसायिक पुनर्वसन आणि व्यावसायिक समुपदेशनाशी संबंधित गरजांची ओळख करुन घेणे, दिव्यांग अर्जदारांना रोजगार, स्वयं-रोजगार, प्रशिक्षण संबंधित माहिती देणे, भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या रोजगार महासंचालनालयाच्या www.ncs.gov.in या राष्ट्रीय करिअर सेवा पोर्टलबद्दल माहिती देणे, आवश्यकतेनुसार इतर सेवा जसे की व्यायसायिक मुल्यांकन, पात्रतेच्या आधारे समुदाय आधारित व्यावसायिक प्रशिक्षणासाठी दिव्यांग अर्जदारांना प्रोत्साहन देणे, नॅशनल करियर सर्विस सेंटर फॉर डिसेबल्ड, मुंबई येथे पॉलीटेक्निक आयटीआय सारख्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सहाय्य आणि पात्रता प्रमाणपत्रासाठी मार्गदर्शन करणे तसेच कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाची देण्यात येणार आहे.