महाराणी ताराबाई यांच्या ३५० व्या जन्म वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन*मोगल मर्दानी महाराणी ताराराणी विद्वत्त परिषदेचे आयोजन

0
57

प्रतिनिधी मेघा पाटील

कोल्हापूर, दि. 20 : शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या रयतेच्या स्वतंत्र सार्वभौम स्वराज्य रक्षीका रणरागिणी ताराराणी यांच्या ३५० व्या जन्म वर्षानिमित्त मोगलमर्दीनी महाराणी ताराबाई विद्वत परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे पन्हाळगडावरील महाराणी ताराबाई राजवाडा, पन्हाळा विद्यालय येथे दिनांक 22 व 23 डिसेंबर रोजी ही परिषद होईल. महाराणी ताराराणी यांच्या ३५० व्या जन्म वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये उद्घाटनाचा सांस्कृतिक कार्यक्रम कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला होता. तसेच सहा महसुली विभागामध्ये भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. तसेच महाराणी ताराराणी यांच्या जीवनावर आधारित एका चित्ररथाचे लवकरच प्रदर्शन कोल्हापूर येथे करण्यात येत असून महाराणी ताराराणी यांच्या जीवनकार्यावर आधारित कॉफी टेबल बुक निर्मिती सांस्कृतिक कार्य विभागाच्या मार्फत होणार आहे. मोगल मर्दानी महाराणी ताराराणी विद्वत्त परिषदेमध्ये दिनांक २२ व 23 डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ७ या वेळेमध्ये विविध कार्यक्रमांचे तसेच व्याख्यानाचे आयोजन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्याचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाने या कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. या सर्वांचा एक भाग म्हणून महाराणी ताराराणी यांच्या ३५० व्या जन्म वर्षानिमित्त मोगल मर्दिनी महाराणी ताराबाई विद्वत्त परिषदेचे आयोजन महाराणी ताराबाई राजवाडा, पन्हाळा विद्यालय,पन्हाळा या ठिकाणी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन रविवार दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी सकाळी १० वाजता खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते होईल. नुतन मंत्री हसन मुश्रीफ व प्रकाश आबीटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. परिषदेचे बीजभाषण ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे होणार असून मोगल मर्दानी महाराणी ताराबाई यांच्यावर आधारित इतिहासाचा मागोवा ते घेणार आहेत.यावेळी खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार सर्वश्री सतेज पाटील, प्रा. जयंत आसगावकर, अरुण लाड, राजेंद्र पाटील-यड्रावकर, चंद्रदिप नरके, डॉ. विनय कोरे, अमल महाडिक, अशोकराव माने, शिवाजी पाटील, राहुल आवाडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.महाराणी ताराराणी यांचे जीवन चरित्र सांगणाऱ्या छायाचित्रांचे प्रदर्शन देखील लावण्यात येणार आहे. महाराणी ताराराणी यांचे प्रशासकीय कौशल्य यावर पुराभिलेख संचालनालयाचे गणेश खोडके यांचे व्याख्यान होणार आहे तर महाराणी ताराराणी पूर्वकालीन स्वराज्याची परिस्थिती यावर प्राध्यापक शंकर चव्हाण व्याख्यान देणार आहेत. इतिहास संशोधक डॉ. कविता गगराणी यांचे “चित्रपट आणि नाटकांमध्ये महाराणी ताराराणी यांचे चित्रण” यावर मार्गदर्शन होईल तर ऋषिराज जाधव हे इतिहासाचे अभ्यासक महाराणी ताराराणी यांच्या रणनीती व युद्ध कौशल्या बद्दल माहिती देतील. तसेच सायंकाळी पाच ते सात दरम्यान मर्दानी खेळ, दीपोत्सव इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल तर गडकोट व महाराणी ताराराणी या विषयावर परिसंवादाचे आयोजन संजीवनी पब्लिक स्कूल, पन्हाळा या ठिकाणी होणार आहे. दिनांक २३ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी हेरिटेज वॉक व्दारे सुरुवात होणार आहे. करवीर राज्य संस्थापक महाराणी ताराबाई व राजर्षी छत्रपती शाहू महाराज या विषयावर इतिहास अभ्यासक राम यादव यांचे व्याख्यान होणार आहे. महाराणी ताराबाई शिल्प आणि चित्रे एक अभ्यास या विषयवार शिल्पकार ओंकार कोळेकर यांचे व्याख्यान होणार आहे. त्यानंतर “राजमाता जिजाऊंचा सक्षम वारसा.. महाराणी ताराबाई” या विषयावार डॉ. पुनम पाटील भूयेकर यांचे “महाराणी ताराबाई यांची चरित्र साधने” या विषयावार डॉ. देविकाराणी पाटील यांचे तर “महाराणी ताराबाई आणि महिला सक्षमीकरण” या विषयावार श्रीमती स्वप्नजा घाटगे यांचे व्याख्यान होणार आहे. समारोप समारंभ प्रसंगी आमदार डॉ. विनय कोरे व शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी.टी. शिर्के मार्गदर्शन करणार आहेत. अभ्यासक, इतिहास संशोधक व नागरिकांनी या विव्दत्त परिषदेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here