कोल्हापूर, दि. 21 : १८ वर्षावरील बेवारस मुलांच्या पुनर्वसनाबाबत आयुक्त, दिव्यांग कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करावयाची आहे. यासाठी जिल्ह्यातील दिव्यांग क्षेत्रात कार्य करणारी व वैद्यकीय क्षेत्रात प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती अशा २ व्यक्तींचा समावेश असणार आहे. यासाठी इच्छुक दिव्यांग कल्याण क्षेत्रात कार्यरत नामवंत तज्ञ व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती व वैद्यकीय क्षेत्रात प्रतिनिधीत्व करणारे तज्ञ व्यक्ती यांनी आपल्या संपूर्ण वैयक्तिक माहिती बरोबरच उल्लेखनीय कार्याच्या माहितीसह जिल्हा समाजकल्याण अधिकारी जिल्हा परीषद कोल्हापूर यांच्याकडे दोन दिवसात अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार यांनी केले आहे.
Home Uncategorized १८ वर्षावरील बेवारस मुलांच्या पुनर्वसन समितीसाठी इच्छुकांनी दोन दिवसात अर्ज करावेत- जिल्हा...