बीडप्रकरणी संघाने वटारले डोळे; मुख्यमंत्र्यांनी घेतली मुंडेंची झाडाझडती…

0
145

प्रतिनिधी मेघा पाटील

प्रतिनिधी बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकारण चांगलेच तापले असून दिवसेंदिवस मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी कायम आहेत. विशेष म्हणजे शनिवारच्या मोर्चानंतर तर भाजपा सरकारपुढील संभाव्य अडचणी वाढायची शक्यता असून भाजपाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठांनी या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केंद्राकडूनही भाजपाच्या वरिष्ठांनी या प्रकरणी गंभीर दखल घेत फडणवीस सरकारची कानउघाडणी केल्याचे सूत्रांकडून समजते.त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील महायुती सरकारवरील दबाव वाढताना दिसत असून विरोधकांसह सामाजिक कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाकडूनही संतप्त प्रतिक्रिया उमटत असून लवकरच कोपर्डीच्या निर्भया हत्याकांडाप्रमाणे सकल मराठा समाजातर्फे जिल्ह्या जिल्ह्यात मोर्चे काढण्यात येतील असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे सरकारवर दबाव वाढताना दिसत असून धनंजय मुंडे यांच्या अडचणीही वाढताना दिसत आहे.पालकमंत्रीपद नव्हे, तर मंत्रीपदही जाणारलवकरच राज्यातील जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाच्या जबाबदारीचे वाटप करण्यात येणार असून सुरवातीपासूनच बीडसाठी धनंजय मुंडे आग्रही होते. मात्र आता पालकमंत्रीपदासोबतच, त्यांच्याकडे असलेले मंत्रीपदही जाऊ शकते अशी चर्चा राजकीय गोटात होऊ लागली आहे. दरम्यान मागील दोन दिवसात वेगाने राजकीय घडामोडी घडत असून या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर भूमिका घेत मंत्री मुंडे यांची कडक शब्दात झाडाझडती घेतल्याचे समजते.शिवसेनेच्या काही मंत्र्यांनीही धनंजय मुंडे यांच्या मंत्रीमंडळ हकालपट्टीवरून सूचक वक्त्व्य केले आहे. मंत्री भरत गोगावले यांनी यासंदर्भात माध्यमांना मुलाखती देताना मंत्री धनंजय मुंडे यांच्या गच्छंतीबद्दल सूचक वक्तव्य केले असून मुख्यमंत्री यासंदर्भात निर्णय घेतील असेही सांगितले आहे. अनेक माध्यमांमध्येही सध्या या विषय गाजत असून त्यातून भाजपा आणि महायुती सरकारची बदनामी होत आहे.दिल्ली निवडणुकीत विरोधकांना कोलीत?दिल्ली आणि बिहारच्या विधानसभा निवडणुका आगामी काळात लागत असून संतोष देशमुख् हत्याकांडाबाबत योग्य वेळी दखल घेतली नाही, तर या निवडणुकांत विरोधकांना आयतेच भाजपा युतीविरोधात कोलीत मिळेल असे भाजपाच्या वरिष्ठ आणि संघाच्या धुरिणांना वाटते. त्यातूनच आता सर्वप्रथम धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून प्रकरण शांत करावे आणि वेळ पडल्यास त्यांचा घटनेत सहभाग आढळल्यास त्यांनाही अटक करावी अशी मागणी आता भाजपाच्या अंतर्गत गोटातून व्यक्त होत आहे.आज सोमवारी यासंदर्भात निर्णय होऊ शकतो असे राजकीय सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here