पुणे शहरातील पोलिस कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानाने वाचले युवतीचे प्राण

0
47

प्रतिनिधी मेघा पाटील

पुणे : पुणे शहरातील मोटर परिवहन विभाग शिवाजीनगर पुणे येथे कार्यरत असलेले पोलिस शिपाई हर्षल शिवरकर यांच्या प्रसंगावधानाने युवतीचे प्राण वाचले आहेत. हर्षल शिवरकर यांचे जनतेकडून कौतुक केले जात आहे. वानवडीत होलेवस्ती येथे २९ डिसेंबर २०२४ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास दुचाकीवरुन जाणाऱ्या युवतीला फिट येऊन रस्त्यावर पडली. त्याठिकाणी असलेले पोलिस शिपाई हर्षल शिवरकर यांनी त्यांना मिळालेल्या प्रशिक्षणानुसार तत्परतेने युवतीला मदत केली. त्यानंतर फिट येऊन बेशुद्ध पडलेली युवती काही वेळात शुद्धीवर आली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. युवतीच्या भावाला फोन करुन त्यांना बोलावून घेतले व युवती त्यांच्या सोबत घरी सुखरुप दाखल झाली. होलेवस्ती भागात राहणारे पोलिस शिपाई हर्षल शिवरकर यांचे कौतुक होत आहे. खाकी वर्दीतील एक हिरो समोर आला. हर्षल शिवरकर यांच्या सारख्या पोलिसांमुळे समाजात पोलिसांविषयी आदरभाव निर्माण होतो. प्रसंगावधान, तत्परता आणि मानवी सहानुभूती या गुणांनी हर्षल शिवरकर यांनी फक्त आपली जबाबदारीच नव्हे, तर समाजाच्या सेवेसाठी केलेल्या कठोर प्रशिक्षणाची झलक दाखवली आहे. पोलिस दलातील असे झोकून देऊन काम करणारे अधिकारी संपूर्ण दलाचा अभिमान वाढवतात. आपणही त्यांच्या कार्याचे कौतुक करणे आणि इतरांना याची जाणीव करून देणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here