निपाणी – बेळगांव सह शहर पंचक्रोशीतील अकराशे महिलाचे पेटाळा मैदानात सामुदायिक महालक्ष्मी स्त्रोत्र पठण – पारपांरिक पोशाखात शोभायात्रा ही संपन्न

0
54

प्रतिनिधी मेघा पाटील

कोल्हापूर – बेळगाव निपाणी सह कोल्हापूर शहरपंचक्रोशीतून आलेल्या अकराशे महिलांच्या सहभागाने करवीर निवासिनी महालक्ष्मी – अंबाबाईच्या चरणी विश्व हिंदू परिषद – कर्नाटक व कोल्हापूर व दास साहित्य परिषद, कर्नाटक यांच्या संयुक्त विद्यमाने लक्ष्मी शोभाने पठण तसेच सहस्त्र कंठगाण गीतरूपी देवी स्त्रोत पठण भक्तीभाव मय वातावरणात संपन्न झाले . त्यानंतर सहस्त्र नामावलीसह कुंकुमार्चन ही पेटाळा मैदानावर उभारण्यात आलेल्या मंडपात झाले . या सोहळया चा प्रांरभ सकाळी आठ वाजता महालक्ष्मी – अंबाबाई मंदीरातून ११०० पिवळया साडया परिधान केलेल्या महिलांच्या शोभायात्रा ने झाला . अंबाबाई मंदीरातून बिनखांबी गणेश मंदीर मार्गे मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर मार्गे प‌द्माराजे गर्ल्स हायस्कूल पेटाळा येथे शोभायात्रा आली , तिथे उभारलेल्या मंडपात सामुदायिक महालक्ष्मी स्त्रोत्र कंठगाण व कुंकुमार्चन व लक्ष्मीशोभान हा सोहळा संपन्न झाला . या सोहळ्यास विश्व हिंदू परिषदेचे बेळगाव विभाग सत्संग प्रमुख डॉ. विजयेंद्राचार्य जोशी यांची आर्शिवाद पर उपस्थिती होती . या वेळी निपाणी च्या आमदार सौ. शशीकला जोल्ले, बेळगाव वि हिप मातृशक्ती विभाग प्रमुख श्रीदेवी कुलकर्णी ,शैवर्या कंचीगौड , शिल्पा शेटर , श्रीकांत पोतनीस, (विश्व हिंदू परिषद कोल्हापूरचे विशेष संपर्क प्रमुख ) – अशोक रामचंदानी , भाजपा मनपा गटनेता अजित ठाणेकर, संतोष पंडीत, कृष्णभट यांचे सह सांस्कृतिक – सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थीतीत हा सोहळा उत्साही मंगलमय वातावरणात संपन्न झाला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here