
प्रतिनिधी मेघा पाटील
मराठी पत्रकार दिनाच्या पार्श्वभूमीवर मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित महाराष्ट्रातील पहिल्या ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन मीडिया इनोव्हेशन हॅकॅथाॅन’चे उद्घाटन करण्याचा बहुमान मिळाला.

सेनापती बापट रस्त्यावरील हॉटेल जेडब्ल्यू मॅरियट येथे आयोजित या सोहळ्यास केंद्रीय सहकार व हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर, ‘पुण्यनगरी’चे समूह संचालक भावेश शिंगोटे, सकाळच्या कार्यकारी संपादक शीतल पवार, ‘लोकमत न्यूज १८’चे निवेदक विलास बडे, विलास जावडेकर डेव्हलपर्सचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष आदित्य जावडेकर, हॅपटीक इंडियाचे प्रमुख दीपक कुलकर्णी, मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी, सचिव मनिष केत, पुणे शहराध्यक्ष पंकज बिबवे आदी उपस्थित होते.



