
इस्लामपूर / प्रतिनिधी : महाराष्ट्रात कामगार सेतुमुळे तालुक्यातील सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ होत आहे. कामगारांचा विचार करून लवकरच बांधकाम कामगारांचे पोर्टल अद्यावत करुन सुरू करावे. याबाबतचे निवेदन कामगार नेते अध्यक्ष अमित कदम यांनी कामगार मंत्री आकाशजी फुंडकर यांना दिले. मंत्री फुंडकर यांनी लवकर पोर्टल सुरू करू असे आश्वासन दिले. या निवेदनात म्हटले आहे की , महाराष्ट्रात कामगार सेतुमुळे सर्व तालुक्यातील सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ होत आहे. कामगारांना नियोजना अभावी रिकाम्या हातांनी मागे जावे लागत आहे. जे रोजंदारी वर काम करत आहेत त्यांना नाहक त्रास होत आहे. बांधकाम कामगार हा प्रामुख्याने स्थायी नसतो. तो काम मिळेल तेथे जात असतो. त्यामुळे पहिली नोंदणी ज्या ठिकाणी केली आहे. त्याच ठिकाणी त्याला इतर लाभासाठी जावे लागत आहे . त्यामुळे हा नाहक त्रास कमी करावा. मुंबई येथे कामगार मंत्री यांच्या दालनात कामगारांच्या विविध प्रश्नांवर कामगार मंत्री आकाशजी फुंडकर यांच्याशी कामगार नेते अमित कदम यांनी विविध प्रश्नांवर चर्चा केली. कामगारांचा विचार करून ७ ते ८ दिवसांत बांधकाम कामगारांचे पोर्टल अद्यावत करुन सुरू करतो. तसेच इतर कामगारांचे प्रश्न लवकरच सोडवितो असे आश्वासन मंत्री फुंडकर यांनी अमित कदम यांना दिले. – यावेळी श्रम भारतीय जनता कामगार महासंघचे अध्यक्ष गणेश ताठे , पिंपरी चिंचवडचे माजी उपमहापौर केशव घोळवे , सांगली जिल्हा भाजपा कामगार मोर्चा अध्यक्ष विनायक जाधव , चंद्रकांत सावंत , तुळशीदास दुंडे , अविनाश देवकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.फोटो ओळी : मुंबई : कामगारांचे पोर्टल अद्यावत करून पुन्हा नोंदणी सुरू करावी याबाबतचे निवेदन कामगार मंत्री आकाशजी फुंडकर यांना देताना कामगार नेते अमित कदम व मान्यवर.