
कोतोली प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
येथील ग्रामपंचायतीचा ध्वजारोहण लोकनियुक्त सरपंच वनिता प्रकाश पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी नेहरु विद्यामंदिर कोतोली, बाबासाहेब पाटील हायस्कूल तसेच प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीपतराव चौगुले महाविद्यालयाचा ध्वजारोहण डॉ. के. चौगुले यांच्या हस्ते करण्यात आला.हनुमान पतसंस्थेचा ध्वजारोहण मेजर सुनील मस्कर यांच्या हस्ते पार पडला.
महाराष्ट्र नागरी पतसंस्थेचा ध्वजारोहण संचालक संभाजी कराळे यांच्या हस्ते करण्यात आला.नेहरू विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजचा ध्वजारोहण मुख्याध्यापक सुरेश लोहार यांच्या हस्ते झाला.बाबासाहेब पाटील हायस्कूलचा ध्वजारोहण सचिव युवराज गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला.स्व.संजयसिंह गायकवाड पतसंस्थेचा ध्वजारोहण राजेंद्र केरबा तुरंबेकर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.कोलोली येथील ध्वजारोहण ग्रामविकास अधिकारी शोभा पाटील यांच्या हस्ते पार पडला.

विनय रावजी कोरे दूध संस्थेचा ध्वजारोहण विकास पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.भैरव विकास सेवा संस्थेचा ध्वजारोहण स. म. पाटील यांच्या हस्ते झाला.ज्योतिर्लिंग हायस्कूलचा ध्वजारोहण मुख्याध्यापक अरुण काळे यांच्या हस्ते पार पडला.प्राथमिक शाळेतील ध्वजारोहण मुख्याध्यापक तुकाराम खांडेकर यांच्या हस्ते करण्यात आला.शिवशंभोज दूध संस्थेचा ध्वजारोहण संजय सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.घोटवडे येथील आनंदी शिक्षण संस्थेचा ध्वजारोहण मुख्याध्यापिका सुनीता सुरेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.माळवाडी ग्रामपंचायत ध्वजारोहण ग्रामपंचायत सदस्या जयश्री गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी सरपंच सागर पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.


