प्रतिनिधी मेघा पाटील
कोल्हापूर प्रतिनिधी: राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांची जयंती यावर्षी १२ जानेवारी रोजी शौर्यतिर्थ रायगड येथे अखिल भारतीय मराठा महासंघ व मराठा स्वराज्य भवन ट्रस्ट वतीने साजरी करण्यात येणार अस़ून १०० जिजाऊंच्या लेकीसह कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने जाणार आहोत. शहाजीराजे भोसले आणि जिजाऊ यांनी रयतेच्या स्वतंत्र सार्वभौम स्वराज्याची संकल्पना मांडली. शिवछत्रपती आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या संकल्पनेला मूर्त रूप दिले. ६ जून १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड येथे *राज्याभिषेक* करून घेतला.अशी हि हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगड.जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली शिवछत्रपतींनी रायगडावरून स्वराज्याचा कारभार चालवला, चौफेर विस्तार केला. शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर जिजाऊंनी रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या पाचाड येथील त्यांच्या वाड्यातच अखेरचा श्वास घेतला. वाड्यापासून काही अंतरावरच जिजाऊंचे समाधी स्थळ आजही सर्वांना प्रेरणादायी आहे. जिजाऊंच्या कार्य कर्तृत्वाची माहिती विशेषतः महिलांना व्हावी या उद्देशाने या विशेष उपक्रमाचे आयोजन रायगड येथे करण्यात आले आहे.याप्रसंगी जिजाऊंची महती सांगणारा स्त्रोत *”शिवरायांची किर्ती सांगे! आईचं माझा गुरु!”* हा मंत्र लोकमानसात नेण्यासाठी प्रयत्नशील रहाणार आहे. हा जयंती उत्सव दौरा न होता अभ्यास दौरा व्हावा यासाठी विशेष नियोजन आखणी करण्यात आली आहे.🚩 *जय जिजाऊ! जय शिवराय!*वसंतराव मुळीक राष्ट्रीय उपाध्यक्ष शशिकांत पाटील जिल्हाध्यक्ष शैलजा भोसले महिला जिल्हाध्यक्षा *अखिल भारतीय मराठा महासंघ**मराठा स्वराज्य भवन ट्रस्ट, कोल्हापूर