
उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासनच्यावतीने राबवल्या जाणाऱ्या वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत महिला महाविद्यालयामध्ये विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत नियमावलीनुसार महाविद्यालयीन ग्रंथालयांची स्वच्छता 27 आणि 28 डिसेंबर 2024 रोजी करण्यात आली. 2 जानेवारी 2025 रोजी ग्रंथ प्रदर्शन महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागांतर्गत घेण्यात आले. ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्धघाटनानिमित्त उपस्थित आदरणीय महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.जी. कुलकर्णी आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. बी .एम.हिर्डेकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच ग्रंथालयात दि.२ जानेवारी 2025 ते ४ जानेवारी 2025 पर्यंत सर्वांसाठी ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आलेला आहे. स्थानिक लेखक परिसंवाद व नव साहित्याची ओळख या कार्यक्रमातंर्गत डॉ. बी.एम.हिर्डेकर यांचे व्याख्यान ठेवण्यात आले त्यांनी २१ व्या शतकातील पिढी ही आभासी जगात जगत आहे मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे वाचन संस्कृती लुप्त होत आहे. माणसाने काही वेळासाठी मोबाईल पार्क करावा व वाचन करावे वाचनाने माणूस घडतो, पुस्तक वाचनाने माणसाला आत्मिक आनंद मिळतो तो जगण्याची कला शिकतो वाचनामुळे आचार विचार आणि नकळत माणसावर संस्कार होत असतात. तसेच त्यांनी व्याख्यानात अनेक आत्मचरित्र्य, लघुकथा, कादंबऱ्या असणारी पुस्तकांची नावे सांगितली. पुस्तक वाचनामुळे लिहिणाऱ्यांच्या व्यथा दुःख आयुष्य भरलेले अनुभव आपल्याला शिकायला मिळतात वाचनासाठी थोडासा वेळ काढावा असे त्यांनी उपस्थित विद्यार्थिनीना संबोधले. तसेच विविध कवितांचे वाचन करून महाविद्यालयातील विद्यार्थिनीना मार्गदर्शन केले. या वाचन पंधरवडा मध्ये पुस्तकाचे सामुहिक वाचन, सेल्फी विथ बुक असे अनेक उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमास महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख ,कॉर्डिनेटर्स ,ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ,आणि विद्यार्थिनीनी उत्तम प्रतिसाद दिला. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष आणि कार्यकारी विश्वस्त डॉ.आर. ए. शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच महाविद्यालयाच्या ग्रंथपाल ए. ए. कुंभार आणि सौ.शिल्पा माजगांवकर यांनी या वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमाचे नियोजन केले.