प्रतिनिधी मेघा पाटील
हातकणंगले ; दोघांनाहातकणंगले येथील पुरवठा कार्यालयातील खासगी कर्मचारी सुभाष घुणके ( वय ३४) आणि शैलेंद्र डोईफोडे ( वय २२) यांना लाचखोरीप्रकरणी रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
तक्रारदाराने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत नाव समाविष्ट करण्यासाठी सुभाष घुणके यांना संपर्क केला होता. घुणके यांनी यासाठी ४००० रुपयांची लाच मागणी केली होती. तक्रारदाराच्या विनंतीनुसार तडजोडीअंती २५०० रुपयांवर रक्कम निश्चित करण्यात आली. याबाबत तक्रारदाराने अॅन्टी करप्शन ब्युरो (एसीबी) कोल्हापूरकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या पडताळणीनंतर, पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत सापळा रचण्यात आला. घुणके यांच्या सांगण्यावरून शैलेंद्र डोईफोडे यांनी तक्रारदाराकडून लाच स्वीकारली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने दोघांना रंगेहाथ अटक केली.
सदर कारवाई पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील, पोलीस हवालदार विकास माने, संदिप काशीद, सचिन पाटील, आणि एसीबी कोल्हापूरच्या टीमने केली. प्रकरणी हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.