

प्रतिनिधी मेघा पाटील
कोल्हापूर – शारीरिक आणि त्याहून अधिक मानसिक कसोटीचा कस लागणारी आयर्न मॅन ही स्पर्धा विजयी होणे या बरोबरीने जीवन संघर्षातील यशस्वीसाठी ती दृष्टी येणे हे अगदी मोलाचे आहे, असे मनोगत ऑस्ट्रेलिया येथील राष्ट्रीय स्पर्धेत आयर्न मॅन किताब विजेता ठरलेल्या राजवर्धन घाटगे यांनी व्यक्त केले.तिटवे येथील शहीद विरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयामध्ये राजवर्धन घाटगेचा सत्कार सोहळा संपन्न झाला. युवा दिनाचे औचित्य साधून मान्यवरांच्या उपस्थितीत हा सत्कार करण्यात आला.





प्रारंभी ऑस्ट्रेलियामध्ये झालेली स्पर्धा आणि त्यासाठी त्यांनी कोल्हापूरसह गोवा या ठिकाणी केलेला धावणे सायकली आणि स्विमिंग चा सराव याचे व्हिडिओ विद्यार्थिनींना दाखवण्यात आले.सराव आणि सातत्याने कोणत्याही कार्यक्षेत्रात यशस्वी होणे यासाठी अगदी कमी वयामध्ये राजवर्धन घाटगे यांनी कृतीशील आदर्श आहे आणि त्यांच्या अनुभवातून सर्व विद्यार्थिनींना नक्कीच प्रेरणा मिळेल, असा विश्वास राजवर्धनचे वडील सचिन घाटगे यांनी व्यक्त केला. शहीद महाविद्यालयांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील १५० हूनअधिक गावांतून ९०० हून अधिक विद्यार्थिंनी शिक्षण घेत आहेतआधुनिक, व्यावसायिक व रोजगाराभिमुख अभ्यासक्रम शिकवले जातात. त्यामुळेच परीक्षेपूर्वीच विद्यार्थिनींना मोठमोठ्या कंपन्या मधून नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. महाविद्यालयाच्या विविध विभागातील विद्यार्थिनी टी.सी.एस., कॅप्जेमिनी सारख्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करत आहेत असे आपल्या स्वागतपर प्रास्ताविकात प्राचार्य प्रशांत पालकर यांनी सांगितले . या वेळी राजलक्ष्मी घाटगे, उपप्राचार्य सागर शेटगे, प्रा. हर्षा पटेल, प्रा.वैभव कुंभार, प्रा. अविनाश पालकर, लाईव्ह मराठी चे जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र मकोटे उपस्थित होते. सुत्रसंचालन वर्षा पोवार यांनी केले तर आभार प्रा.दिग्विजय कुंभार यांनी मानले. मुख्य व्याख्यान अंतर प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सुंवाद साधला .