प्रतिनिधी मेघा पाटील
कोल्हापूर/
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे चेअरमन मौलाना खालिद सैफुल्ला रहमानी हे शनिवारी 18 जानेवारी रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत.त्यांच्यासोबत मुफ्ती मोहम्मद आशपाक कास्मी
काजी ए शरियत अकोला हे सुद्धा येणार आहेत
दरम्यान शिरोली जवळील पटेल हॉल येथे दुपारी 2 वाजता कोल्हापुरातील मुस्लिम समाजातील सर्व धर्मगुरुना ते संबोधित करणार आहेत.त्यानंतर सायंकाळी 6 वाजता दारूल कजा अर्थात पारिवारिक सल्ला व पती पत्नी मधील आपसातील वादविवाद आणि मुस्लिम धर्माच्या सद्य परिस्थितीबाबत विवेचन याबाबत दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंग येथे मुस्लिम समाजातील विविध मान्यवरांना मौलाना खालिद सैफुल्ल्ला रहमानी प्रवचन देणार आहेत.मुस्लिम बांधवांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकानी केले आहे