SP-9 News रत्नागिरी संपादक: मेघा कुलकर्णी -कोल्हटकर
रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडी शहर अध्यक्षपदी धडाडीच्या कार्यकर्त्या सुस्मिता सुर्वे यांची निवड करण्यात आली आहे. रत्नागिरी शहरात समाजिक कार्यात कायम अग्रेसर असणाऱ्या सुस्मिता सुर्वे यांची निवड करून मनसेने महिला आघाडीत एक डॅशिंग चेहरा दिला आहे.
पद नियुक्तीबाबत बोलताना सुस्मिता सुर्वे यांनी सांगितले की, रत्नागिरी शहरात महिलांकरिता मनसेमार्फत काम करण्यासाठी जी संधी मिळाली आहे, ती मी पुरेपूर पार पाडेन आणि रत्नागिरी शहरात महिलांकरिता भरीव कामं करेन.
याबरोबरच सौ. संपदा महेंद्र सिंह राणा यांची महिला शहर सचिव, तर सौ. बिस्मिल्ला मेहबुब नदाफ यांची महिला शहर संघटकपदी निवड करण्यात आली. नवनियुक्त कार्यकारिणीने येणाऱ्या आठवड्यात संपूर्ण शहरात इतर नेमणुका करून महिला आघाडी सक्षमपणे कार्यरत करण्याचा मानस बोलून दाखवाला.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, उपाजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर, माजी तालुकाध्यक्ष सचिन शिंदे, कामागार सेना जिल्हा चिटणीस महेंद्र गुळेकर, शहर अध्यक्ष बाबय भाटकर, शहर सचिव प्रभात सुर्वे, कार्यालय प्रमुख शैलेश मुकादम आदी उपस्थित होते.