कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी प्रकाश आबिटकर, वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी हसन मुश्रीफ

0
475

प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा कोल्हापूर : गेले काही दिवस प्रतीक्षा लागून राहिलेल्या पालकमंत्री पदाच्या नियुक्ती शनिवारी करण्यात आल्या. कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी शिवसेना शिंदे गटाचे आमदार व आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची नियुक्ती करण्यात आली तर सांगलीच्या पालकमंत्री पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती झाली. सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी शंभूराजे देसाई यांच्याकडे सोपीविण्यात आले आहे. तर कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी प्रयत्न असलेल्या मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवली. पंकजा मुंडे यांच्याकडे जालन्याची तर बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याप्रमाणे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारले. अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची ही जबाबदारी आहे. रायगडच्या पालकमंत्री पदी अदिती तटकरे तर संजय शिरसाठ यांच्याकडे संभाजीनगरचे पालकमंत्री पद आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाणे अशा दोन ठिकाणचे पालकमंत्री पद आहे. गिरीश महाजन यांच्याकडे नाशिक तर गुलाबराव पाटील यांच्याकडे जळगाव जिल्हा सोपविला आहे. कोल्हापूर जिल्ह्याला सहपालकमंत्री पद देण्यात आले आहे. सहपालकमंत्री पदी माधुरी मिसाळ यांची नियुक्ती झाली आहे त्या पुणे जिल्ह्यातील भाजपचे आमदार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here