नागरिकांना लोकाभिमुख योजना आणि चांगल्या आरोग्य सेवा देण्यासाठी गतीने कामे करा- जिल्हाधिकारी अमोल येडगे

0
53

प्रतिनिधी मेघा पाटील

चंदगड, गडहिंग्लज आणि आजरा तालुक्यातील कामकाजाबाबत आढावा

कोल्हापूर, दि. २२ : नागरिकांना लोकाभिमुख योजना आणि चांगल्या आरोग्य सेवा देण्यासाठी गतीने कामे करा अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. चंदगड, गडहिंग्लज आणि आजरा तालुक्यातील कामकाजाबाबत आमदार अशोक पाटील यांच्या समवेत तालुक्यातील विविध विभागांचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी ते म्हणाले, जनतेला न्याय देण्यासाठी कामे करा. प्रत्येक विभागाने आपल्या कामाची गती वाढवून शासनाच्या महत्त्वकांक्षी योजना दुर्गम भागातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचतील यासाठी सूक्ष्म नियोजन करा. शासकीय कामकाज करीत असताना ते अधिक लोकाभिमुख होण्यासाठी गावस्तरावर दौरे करा. आरोग्यविषयक सुविधा चांगल्या पद्धतीने गरजूंना द्या अशा सूचनाही त्यांनी या बैठकीवेळी उपस्थितांना दिल्या. बैठकीला आमदार शिवाजी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, माजी राज्यमंत्री भरमू आण्णा पाटील, उपवनसंरक्षक कोल्हापूर वनविभाग कोल्हापूर जी.गुरुप्रसाद, प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, तहसीलदार राजेश चव्हाण तसेच सर्व विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी विविध प्रस्तावित व प्रलंबित विकासकामे, कृषी विभाग, प्रशासकीय विभाग, पोलिस विभाग तसेच वनविभागातील विविध समस्यांवर चर्चा केली. ते म्हणाले, नागरिकांकडून आलेले अर्ज त्यावर तातडीने चर्चा करून प्राधान्याने निघाले निघतील यासाठी प्रक्रिया राबवा. त्याचबरोबर आमदार महोदयांनी त्यांच्याकडून दिलेले अर्जही तसेच लोकशाही दिनामध्येही आलेले अर्ज तातडीने निकाली काढा. यावेळी आमदार पाटील यांनी मतदारसंघात असणारे प्रश्न बैठकीत मांडले. ते म्हणाले, आरोग्यविषयक सुविधा आणि सेवा चांगल्या प्रकारे वाढविणे आवश्यक आहे तसेच तालुक्यातील 16 धनगर वाड्यांसाठीही आवश्यक सुविधा द्याव्यात, तिलारी घाटातील वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू व्हावी, आदी विषय त्यांनी या बैठकीत मांडले.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा व पर्यटन विकासाबाबत क्षेत्रीय भेटी

बैठकीनंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्या समवेत चंदगड, नागनवाडी, तलाठी कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलीस स्टेशन तसेच स्वप्नवेल पॉईंट यासह तिलारी येथील पॉईंटला भेट देऊन तेथील पाहणी केली.

या भेटीत प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधा आणि कामकाजचा आढावा घेतला. उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना चांगली सेवा देण्यासाठी त्यांनी सूचना दिल्या. शाळेमध्ये भेटीवेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पर्यटन विषयक कामांचा आढावा घेवून रस्ते, सुविधा याबाबत आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here