श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाउसच्या कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये IGBC Student Chapter ची स्थापना..

0
57

एस पी नाईन प्रतिनिधी मेघा पाटील

प्रतिनिधी कोल्हापूर: श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाउसचे कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये IGBC Student Chapter ची दिनांक ३१ जानेवारी २०२५ रोजी स्थापना झाली. ISHRAE Kolhapur Chapter आणि कॉलेज ऑफ आर्किटेक्चर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये श्री. भावेश मेहता (Core Member IGBC, IGBC Fellow Member) यांनी भारतातील ग्रीन बिल्डींग या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी श्री. प्रमोद पुंगावकर (Tressure Kolhapur Chapter), श्री विजय पाटील, श्री. सचिन कांबळे (ISHRAE committee member) हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी चेअरमन श्री. के. जी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे नियोजन कॉलेजचे प्राचार्य श्री. चिदंबर दुदगीकर, प्रा. मनोरमा पाटील, प्रा.वंदना पुसाळकर, प्रा.सानिया कुलकर्णी यांनी केले. सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते.प्रा. सी. एस. दुदगीकरप्राचार्य,श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाउसचे,कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, कोल्हापूर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here