कोल्हापूर, दि. 7 : जिल्ह्यात पीएम नॅशनल अप्रेंटिसशिप मेला (PMNAM) अंतर्गत शिकाऊ उमेदवारी भरती तथा रोजगार मेळावा सोमवार दिनांक १० फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजल्यापासून राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळंबा रोड, कोल्हापूर येथे आयोजित केला आहे. या मेळाव्यास जिल्ह्यातील नामांकीत आस्थापना सहभागी होणार आहेत. आयटीआय उत्तीर्ण व शिकाऊ उमेदवारी पूर्ण झालेले तसेच इतर पदवी व पदविकाधारक, बारावी पास, बारावी नापास उमेदवारांनी मार्कलिस्ट व आधारकार्ड घेवून मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एम. एस. आवटे व एम. आर. बहिरशेट, सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार, मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र, व्दारा राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर यांनी केले आहे.
प्रतिनिधी मेघा पाटील