प्रतिनिधींनी मेघा पाटील
कोल्हापूर -सावली सोशल सर्कलच्या वतीने लिंगायत बिझनेस फोरम समावेत ‘वाचकांचा पत्रव्यवहार – सामाजिक संस्था परिचय ‘ या विषयावर कार्यशाळा पार पडली. या निमित्ताने वाचकांचा पत्रव्यवहार काल, आज आणि उद्या या विषयावर लाईव्ह मराठीचे सरव्यवस्थापक प्रमोद मोरे यांनी हितगूज केले. पत्रव्यवहाराचे स्वरुप आता हळूहळू डिजिटल होऊ लागले असल्याचे त्यांनी सांगीतले. पुर्वी होणारा पत्रव्यवहार आता रिल्स किंवा व्हिडिओच्या रुपात होऊ लागला आहे. मात्र त्यामध्ये फसवाफसवीचे प्रसंगही जास्त होऊ लागल्याने माध्यमांना जास्त सावधगीरी बाळगावी लागते असे ते म्हणाले. त्याआधी अॅड. विनय कदम यांनी वाचकांचा पत्रव्यवहाराविषयी कायदेशीर बाबींवर मार्गदर्शन केले. त्यांनी पत्रव्यवहाराशी संबंधीत अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मानहानी, अवमान, अब्रुनुकसान यातील फरक स्पष्ट केला. पत्रव्यवहार करताना तसेच त्यामध्ये कोणावरही टिका करताना पाळावयाची पथ्ये त्यांनी विषद केली. त्यानंतर वाचकांचा पत्रव्यवहार – साध्य आणि लेखन कौशल्य या विषयावर ज्येष्ठ पत्रकार समिर देशपांडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. एखादे वाचकांचे पत्र वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावरील बातमीचा किंवा एखाद्या अग्रलेखाचाही विषय बनू शकतो. त्यामूळे पत्रलेखन करताना खूप विचारपुर्वक आणि अभ्यासपूर्वक शब्दयोजना करावी तसेच तरुणांनी विशेषत: पत्रकारीता क्षेत्रात करीयर करु इच्छिणार्या व्यक्तींनी विविध विषयांचे वाचन केले पाहिजे असे त्यांनी सुचवले.या कार्यशाळेला शहिद महाविद्यालय, टिटवे वारणा महाविद्यालय घोडावत विघापीठ या संस्थांतील पत्रकारीता अभ्यासक्रमाचे विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांबरोबर कोल्हापूर�