गांधीनगर व्यापारपेठेच्या प्रगतीत सिंधू एज्युकेशन सोसायटीचा मोलाचा वाटा – ना. चंद्रकांतदादा पाटील

0
46

प्रतिनिधी रोहित डवरी

गांधीनगर, ता. ८ः सिंधू एज्युकेशन सोसायटीने गांधीनगरातील व्यापारपेठेच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलला आहे. या शाळेने चांगले नागरिक निर्माण केले असे प्रतिपादन राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. गांधीनगर (ता. करवीर) येथील सिंधू एज्युकेशनस सोसायटीच्या गांधीनगर हायस्कूलच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार अमल महाडिक प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. जी. एच. नरसिंघाणी होते.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर शाळेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर सिंधू एज्युकेशन सोसायटीच्या नव्याने सुरु झालेल्या वरीष्ठ महाविद्यालयाच्या नामफलकाचे उद्घाटन मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना पुढे मंत्री पाटील म्हणाले की, सिंधी समाजाने व्यापारामध्ये चांगली प्रगती केली आहे. शिवाजी विद्यापीठामध्ये सिंधी विभाग सुरु करण्यासाठी प्रयत्न करु. यावेळी उपस्थितांचे स्वागत डॉ. जी. एच. नरसिंघाणी यांनी केले तर प्रास्ताविक नरेश चंदवानी यांनी केले. आभार रमेश लालवाणी यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोमा चांदबलानी यांनी केले. कार्यक्रमाला शाळेचे सुमारे साडेतीन हजारहून अधिक माजी विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी सहयोग फौंडेशनचे डॉ. राम जेवरानी, शिवाजी विद्यापीठाचे प्रकुलगुरु डॉ. पी. एस. पाटील, ज्येष्ठ व्यापारी शंकर दुल्हानी, सौ. अंजली पाटील, विनोद नरसिंघानी, दयालदास चंदवानी, कांचन पंजवानी, नारुमल नरसिंघानी, शाम नोतानी, अमित कटार, साहिल दर्डा, अमित डेंबानी, गिरीश पंजवानी, रवि निरंकारी, विजय दुल्हानी, अमित जसूजा, विजय नागदेव, विनोद आहुजा, संजय नरसिंघानी, अमित निरंकारी, साहिल जसूजा, संतोष कुकरेजा, शाम बासरानी, पूजा नोतानी, रश्मी सचदेव, सीमा चावला कुकरेजा, महेक निरंकारी, किर्ती दुल्हानी, दिपीका लालवानी खूबचंदानी, रेखा चावला भटेजा, स्नेहा खटवानी, प्रीती डेंबडा कटार, भक्ती चावला, मुस्कान खूबचंदानी आदिंनी कार्यक्रमाचे संयोजन केले. ————————फोटो ओळी – गांधीनगर (ता. करवीर) येथील सिंधू एज्युकेशन सोसायटीच्या वरीष्ठ महाविद्यालयाच्या नामफलकाचे उद्घाटन करताना उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील, सौ. अंजली पाटील, आमदार अमल महाडिक, शिवाजी विद्यापीठाचे प्रकुलगुरु डॉ. पी. एस. पाटील, संस्थेचे अध्यक्ष डॉ. जी. एच. नरसिंघानी आदिंसह उपस्थित मान्यवर.————————-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here